जळगाव cyclist ग्रुप तर्फे पहिल्यांदाच दि.14 जून ते 16 जून 2023 दरम्यान पर्यावरणाचा संदेश देण्याच्या उद्देशाने जळगाव ते पंढरपूर सायकल वारीचे आयोजन

पंढरपूर वारी च्या T-shirt चे अनावरण

जळगाव cyclist ग्रुप तर्फे पहिल्यांदाच दि.14 जून ते 16 जून 2023 दरम्यान पर्यावरणाचा संदेश देण्याच्या उद्देशाने जळगाव ते पंढरपूर सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. नुकतेच जिल्हाधिकारी श्री अमन मित्तल, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. प्रतापराव पाटील यांचे हस्ते सायकल वारीत वापरल्या जाणार्‍या Tshirts चे अनावरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सायकल वारीतील सदस्यांचा उत्साह वाढवत शुभेच्छा दिल्या. 14 जून 2023 रोजी सायकल वारीची सुरुवात सकाळी 5 वाजता विठ्ठल मंदिर, जुने जळगाव येथून होणार आहे. या सायकल वारीमध्ये जळगाव, भुसावळ, जामनेर येथील सायकलिस्ट सहभागी होत असून यात 4 महिलांचाही समावेश आहे. तब्बल 490 किमी चे अंतर सायकलिंग करत सायकलिस्ट वारकरी तिसर्‍या दिवशी पंढरपूरला पोहोचणार आहेत. आयोजका तर्फे सायकलिस्ट वारकरी साठी हायड्रेशन, ब्रेकफास्ट, जेवण, रहाणे आदींची व्यवस्था करण्यात आली आहे.