पाचोरा येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती‌ कोरोनाचे नियंम पाळुन उत्साहात साजरी

पाचोरा येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती‌ कोरोनाचे नियंम पाळुन उत्साहात साजरी

गिरणा पंपिंग रोड बळीराम पाटील नगर शेजारील साई गणेश नगर येथील जिल्हा अध्यक्ष शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन (माऊली) यांच्या प्रांगणात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतीमेचे पुजन बेबाबाई विठ्ठल महाजन यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश बळीराम पाटील यांच्या हास्ते माल्यार्पण करण्यात आले,तसेच सावित्री बाई फुलेंच्या ऐतिहासिक जिवनावर आधारीत मनोगत सादर करतांना सुरेश भिमराव पाटील, मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय राजगुरे ,जागृती विद्यालयाचे शिक्षक राजु सांवत नवजिवन विद्यालयाचे चव्हाण आणि तावरे विद्यालयाची विद्यार्थीनी गायत्री युवराज महाजन, परीसरातील महीलांनी मनोगत व्यक्त केले,व सु.भा. पाटील विद्या मंदीराची विद्यार्थीनी अंकीता अशोक माळीने शैक्षणिक अहिराणी गित सादर केले तसेच जिल्हा अध्यक्ष,शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन यांनी सावित्रीबाई फुलेंच्या जिवनावर आधारीत पोवडा सादर केला,कार्यक्रमात उपस्थित बहुजन समाजातिल मंडळी भास्कर नाना पाटील, हारीभाऊ आदीवाल,दिपक माने निलेश मराठे प्रविण भाऊ पाटील,हिरालाल परदेशी, प्रकाश ना. चौधरी, संदीप भाऊ पाटील साहेब,सी.एम.पाटील, आबा चौधरी,विजय भोई,किरंण महाजन साहेब,धनराळे साहेब,अर्जूंन भाऊ सुर्यवंशी,व सर्व बहुजन समाजातील महिला पुरूष विद्यार्थी विद्यार्थींनींनी सहभाग घेऊन कार्यक्रंम यशस्वी रित्या पार पडला, सुत्र संचालन व उपस्थितांचे आभार संजय राजगुरे यांनी मानले