Home जळगाव महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अमळनेर तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अमळनेर तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अमळनेर तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर

 

अमळनेर : तालुकाध्यक्ष डॉ. समाधान मैराळे यांची तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर त्यांनी आज अमळनेर तालुक्याची नूतन कार्यकारिणी जाहीर केली असून विविध पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी संघटनेच्या बळकटीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

 

जाहीर करण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे —

अध्यक्षपदी डॉ. समाधान मैराळे, कार्याध्यक्षपदी सुरेश कांबळे, सचिवपदी प्रवीण बैसाणे यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष म्हणून हितेंद्र बडगुजर व रिझवान मण्यार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संघटकपदी आत्माराम अहिरे, सहसंघटकपदी गणेश चौहान व राहुल भदाणे यांची निवड करण्यात आली आहे. सल्लागार म्हणून यदुविर पाटील व सुरेंद्र जैन यांची नियुक्ती झाली आहे. प्रसिद्धी प्रमुख म्हणून योगेश पाने यांची निवड करण्यात आली आहे.

तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून सत्तार खान, किशोर वाणी, रामेश्वर पवार, महेश संदानशिव, अजय बिऱ्हाडे, दीपक कुंभार, सागर पवार, किशोर पाटील, परेश उदेवाल यांचा समावेश करण्यात आला आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. समाधान मैराळे यांनी सांगितले की, संघटनेच्या विकासासाठी आणि विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी ही नवी कार्यकारिणी सक्षमपणे काम करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Don`t copy text!