मीरीतील क्रिकेट सामन्यांतील पहीले बक्षीस मीरी,दुसरे बक्षीस चांदा,तिसरे बक्षीस पाडळी येथिल क्रिकेट संघाना प्रदान

मीरीतील क्रिकेट सामन्यांतील पहीले बक्षीस मीरी,दुसरे बक्षीस चांदा,तिसरे बक्षीस पाडळी येथिल क्रिकेट संघाना प्रदान

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथिल क्रिकेट सामन्यात पहिले बक्षीस मीरी, दुसरे बक्षीस चांदा, तिसरे बक्षीस पाडळी या गावातील क्रिकेट संघांना अहिल्या नगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अक्षय कर्डिले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.त्या प्रसंगी ते म्हणाले की मीरी परिसरातील खेळाडूंनी राज्य व देश पातळीवरील क्रिकेट स्पर्धेत सहभागी होऊन आपली चमकदार कला दाखवली पाहिजे.आणि त्या सर्व खेळाडूंना भारतीय क्रिकेट संघात खेळण्याची संधी मिळावी यासाठी मैदानी खेळांना प्रोत्साहन देणे अत्यंत गरजेचे आहे. दिवंगत आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांनी नेहमीच मतदार संघातील खेळाडूंना आज पर्यंत सर्वतो परी सहकार्य केले असून,त्याच धर्तीवर भविष्यातही खेळाडूंच्या प्रगतीसाठी आवश्यक ते सर्व प्रकारचे विशेष सहकार्य करण्यात येईल,अशी ग्वाही अक्षयदादा कर्डिले यांनी दिली. ते

पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे आयोजित करण्यात आलेल्या कै.”आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब चषक” या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यातील बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील सुमारे ५० विविध गावांतील क्रिकेट संघ सहभागी झाले होते.

स्पर्धेतील शेवटचा सामना हा मिरी विरोधात चांदा या दोन संघांमध्ये खेळण्यात आला.चांदा संघाने दमदार खेळी करत मीरी संघापुढे ८९ धावांचे आव्हान उभे केले होते. मात्र मिरी संघाने या धावांचा यशस्वी पाठलाग करत अंतिम सामन्यात विजय मिळवून सर्वात प्रथम क्रमांकाचे मानाचे बक्षीस मिळवले आहे.यामुळे ज्या गावात स्पर्धा आयोजित झाली, त्याच गावचा संघ विजयी ठरल्याने खेळाडू व प्रेक्षकां मध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. सर्व विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना युवानेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

यावेळी भाजपा मंडल तालुकाध्यक्ष संतोष शिंदे, मिरी–तिसगाव पाणीपुरवठा नळ योजनेचे अध्यक्ष एकनाथराव आटकर, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नंदकिशोर नरसाळे, उद्योजक विजय शेठ कोळगे, गीतेवाडीचे सरपंच जनार्दन गीते,ग्रामपंचायत सदस्य सुभाष गवळी,ज्येष्ठ नेते राजूमामा तागड, पैलवान बाळासाहेब शिपणकर यांच्यासह मिरी पंचक्रोशीतील क्रिकेटप्रेमी, खेळाडू व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही स्पर्धा यापुढे पुढील दर वर्षी खेळली जाणार असून पुढील वर्षाच्या स्पर्धेचे स्वरूप हे अतिशय भव्य दिव्य स्वरूपात राहणार असून जिल्ह्यासह ईतर राज्यातूनही या ठिकाणी खेळाडू सहभागी होतील असा विश्वास आयोजकांच्या वतीने व्यक्त करण्यात आला. ही स्पर्धा क्रिकेट प्रेमींना सामना पाहण्यासाठी चांगलीच पर्वणी ठरली होती. या खेळासाठी मैदान उपलब्ध करून देण्यासाठी इनामदार पाटील यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.