Home जळगाव टहाकळी येथे ‘कायदा प्रशिक्षण शिबिर’ उत्साहात संपन्न

टहाकळी येथे ‘कायदा प्रशिक्षण शिबिर’ उत्साहात संपन्न

टहाकळी येथे ‘कायदा प्रशिक्षण शिबिर’ उत्साहात संपन्न

 

धरणगाव (प्रतिनिधी) – नागरिकांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने टहाकळी येथे आयोजित करण्यात आलेले ‘कायदा प्रशिक्षण शिबिर’ उत्साहात पार पडले. के. सी. ई. सोसायटीच्या एस. एस. मणियार विधी महाविद्यालय, जळगाव यांच्या विधी चिकित्सालयामार्फत हा उपक्रम राबविण्यात आला.

 

रविवार, दि. २२ मार्च २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजता टहाकळी येथील ग्रामपंचायत कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात नागरिकांना विविध कायद्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून हुंडाबळी, कौटुंबिक हिंसा, फसवणूक, भोंदू बाबांकडून होणारी पिळवणूक यांसारख्या सामाजिक विषयांवर प्रभावी सादरीकरण केले.

 

या कार्यक्रमाचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश कनिष्ट स्थर न्याय न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग धरणगावचे आशिष सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव ॲड. प्रमोद एन. पाटील हे होते. तर तालुका विधी सेवा प्राधिकरण, धरणगावचे सदस्य व इतर वकील बांधव यांची विशेष उपस्थिती लाभली.

 

या उपक्रमासाठी टहाकळी ग्रामपंचायतीचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी सरपंच सौ. सविता सुरेश कोळी, उपसरपंच मधुकर सुकदेव पाटील, ग्रामपंचायत अधिकारी संजय गंगाराम जाधव तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

महाविद्यालयाच्या वतीने प्रा. डॉ. योगेश महाजन, प्रा. बी. एस. पाटील, प्रा.जी. व्ही. धुमाळे, प्रा. डॉ. विजेता सिंग, प्रा.डॉ. ज्योती भोळे, प्रा.स्वाती लोखंडे, वरिष्ठ लिपिक भूषण चौधरी यांच्यासह वकील संघाचे सदस्य व गावाचे जिल्हा परिषद शिक्षक शांताराम चैत्राम पाटील आदी उपस्थित होते.

 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक प्रा. डॉ. योगेश महाजन यांच्या नियोजनातून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

 

या शिबिरामुळे नागरिकांच्या कायदेविषयक शंकांचे निरसन होऊन कायद्याबद्दलची भीती दूर होण्यास मोठी मदत झाली असून, अशा उपक्रमांची गरज अधोरेखित झाली आहे.

Don`t copy text!