पंचायत समिती पाचोरा अंतर्गत तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन

पंचायत समिती पाचोरा अंतर्गत तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन

दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी अल्पबचत भवन पंचायत समिती पाचोरा येथे करण्यात आले. यावेळी बुद्धिबळाच्या पटावर चाल खेळून श्री अतुल पाटील गटविकास अधिकारी पाचोरा यांच्या हस्ते सदर स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्री एन आर ठाकरे सर उप मुख्याध्यापक यांनी बुद्धिबळ स्पर्धेच्या नियम व अटींची माहिती प्रास्ताविकात करून दिली यावेळी एन एफ चौधरी गटशिक्षणाधिकारी श्री सी एस वाडीले शाखा अभियंता श्री आर एस धस विस्ताराधिकारी श्री नंदकिशोर पाटील ग्रामसेवक श्री हितेश पाटील ग्रामसेवक व इतर पंचायत समिती अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी स्पर्धेचे पंच म्हणून श्री एन आर ठाकरे सर यांनी कामकाज केले सदर स्पर्धेचे व्यवस्थापन श्री अमोल पाटील कनिष्ठ प्रशासन अधिकारी व श्री जितेंद्र बडगुजर वरिष्ठ सहाय्यक पंचायत समिती पाचोरा यांनी केले