व्हाईस ऑफ मीडियाच्या डिजिटल विभाग नागपूर जिल्हाध्यक्षपदी देवनाथ गंडाटे यांची नियुक्ती

व्हाईस ऑफ मीडियाच्या डिजिटल विभाग नागपूर जिल्हाध्यक्षपदी देवनाथ गंडाटे यांची नियुक्ती

नागपूर (प्रतिनिधी) राष्ट्रीय स्तरावर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी संघटना म्हणून व्हाईस ऑफ मीडियाची ओळख आहे. या संघटनेच्या डिजिटल विभागाच्या नागपूर जिल्हाध्यक्षपदी देवनाथ गंडाटे यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि डिजिटल मीडिया विभाग प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड तसेच नागपूर जिल्हाध्यक्ष आनंद आंबेकर यांनी ही नियुक्ती केली आहे. त्यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच देण्यात आले.

देवनाथ गंडाटे २००२ पासून पत्रकारितेत कार्यरत असून, चंद्रपूर, नागपूर, अलिबाग आणि विदर्भातील विविध जिल्ह्यात पत्रकारितेचा अनुभव आहे. दैनिक सकाळच्या विदर्भ आवृत्तीत दीर्घकाळ १४ वर्ष पत्रकारिता केली. तसेच अलिबाग येथील कृषीवल, नागपुरातील लोकशाही वार्तात वरिष्ठ उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव आहे. केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याकडून मान्यताप्राप्त डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रीव्हन्स कौंसिल ऑफ इंडिया या स्वनियमन संस्थेचे सदस्य आहेत. विशेष म्हणजे त्यांचे “डिजिटल मीडिया संधी आणि आव्हाने” हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. पत्रकारितेसोबत वेबडिझाइन, सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग, ब्लॉगिंग या विषयाचा अभ्यास आहे.

व्हाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यात कार्यरत डिजिटल मीडिया पत्रकारांचे संघटन मजबूत करून त्यांना नव्या तंत्रज्ञानांची ओळख करून देण्याचा मानस त्यांनी नियुक्तीनंतर व्यक्त केला आहे. नागपूर जिल्ह्यातील डिजिटल मीडियाची कार्यकारिणी लवकरच घोषित करण्यात येणार असून, संघटनेत सदस्य होण्यासाठी 7264982365 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.