Home पाचोरा तालुका चेतन पिंगळेचे शालांत परीक्षेत घवघवीत यश ; ९७.८० टक्के गुणांनी शाळेची मान...

चेतन पिंगळेचे शालांत परीक्षेत घवघवीत यश ; ९७.८० टक्के गुणांनी शाळेची मान उंचावली

चेतन पिंगळेचे शालांत परीक्षेत घवघवीत यश ; ९७.८० टक्के गुणांनी शाळेची मान उंचावली

 

 

भडगाव प्रतिनिधी : येथील प्रा. एल. के. वाणी, पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालयाचे उपशिक्षक तथा सौ. स्वाती लक्ष्मण वाणी, कै. सौ. विमलताई उत्तमरावजी पाटील अनुदानित आश्रमशाळा, पिंपरखेड येथील उपशिक्षिका यांचे सुपुत्र चेतन पिंगळे याने शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, बाळद रोड, भडगाव येथील विद्यार्थी असलेल्या चेतनने तब्बल ९७.८० टक्के गुण प्राप्त करून शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे. त्याच्या या यशामुळे परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
चेतनच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव पाटील, सचिव प्रशांतजी पाटील, व्हाईस चेअरमन पूनमताई पाटील, समन्वयक प्रा. सुनील पाटील, प्राचार्या सौ. विद्या पवार, सरिता बाविस्कर मॅडम तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Don`t copy text!