आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ दिनाच्या अनुषंगाने संपूर्ण पाथर्डी तालुक्यातील पोलिसांच्या बीट हद्दीत व्याख्यान/कार्यशाळेचे आयोजन

आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ दिनाच्या अनुषंगाने संपूर्ण पाथर्डी तालुक्यातील पोलिसांच्या बीट हद्दीत व्याख्यान/कार्यशाळेचे आयोजन

 

(सुनिल नजन चिफब्युरो स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) आंतरराष्ट्रीय पातळीवरील अंमली पदार्थ दिनाच्या निमित्ताने संपूर्ण पाथर्डी तालुक्यातील पोलिसांच्या बीट येथील हद्दीत व्याख्यान आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील पाथर्डी शहर,खरवंडीकासार, टाकळीमानुर, मोहोजदेवढे, माणिकदौंडी, तिसगाव,करंजी,मीरी, कासार पिंपळगाव या पोलिस बीट क्षेत्राच्या हद्दीत ही व्याख्यानमाला/ कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.संबंधीत बीट हवालदार, पोलिस कॉन्स्टेबल,शिपाई, यांना उपस्थित राहण्याचे लेखी आदेशच पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी काढले आहेत.हा उपक्रम शाळा किंवा ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात यावा असे कळविण्यात आले आहे.पाथर्डी शहरातील कसबा पेठेतील कन्या शाळा,फ्लाईंगबर्ड स्कुल,आनंद सिनियर विद्यालयासाठी पोलिस सब इन्स्पेक्टर विलास जाधव यांची नेमणूक करण्यात आली आहे.शिरसाटवाडी येथे आव्हाड पो.कॉं. दुलेचांदगाव येथे बटुळे पोलिस,माळी बाभुळगाव येथे गरगडे पो.कॉं.खरवंडी कासार येथील दुरक्षेत्रातील भालगाव येथे पवार साहेब,कोरडगाव येथे खेडकर, म्हस्के,टाकळी मानुर दुर क्षेत्रातील चिंचपूर ईजदे, टप्पा पिंपळगाव,टा.मा.साठी कानडे, बडे,मोहोज देवढे दुरक्षेत्रासाठी गर्जे, घुगे, माणिकदौंडी दुर क्षेत्रासाठी पोसई पवार, गायकवाड,चाळक, तिसगाव दुरक्षेत्रासाठी ढाकणे,लबडे, करंजी दुरक्षेत्रासाठी चव्हाण, राठोड,मीरी दुर क्षेत्रासाठी स.फौ.लबडे,कुसळकर,टकले, कासार पिंपळगाव आणि पागोरी पिंपळगाव दुर क्षेत्रासाठी नितीन दराडे आणि जवरे या पोलिस अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत.सर्वांनी आपल्या कार्यक्षेत्रात झालेल्या कार्यक्रमाचा लेखी अहवाल वरीष्ठांना देणे आवश्यक आहे.दिनांक १३ऑगष्ट रोजी पाथर्डी शहरातील बाबुजी आव्हाड महाविद्यालय, आणि संत ज्ञानेश्वर विद्यालयात पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ दिनाच्या निमित्ताने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.या व्याख्यानमालेत अंमली पदार्थांचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, तरूणावर होणारा विपरीत प्रभाव,एन.डी.पी.एस.कायदा आणि त्यातील शिक्षेची तरतूद व गांभीर्य,व्यसनमुक्ती उपाय योजना, स्वतःची आणि मित्र परीवाराची जबाबदारी,आणि पोलिस विभागाची कर्तव्यदक्ष भुमिका या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी बाबुजी आव्हाड आणि संत ज्ञानेश्वर या दोन्ही शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी,शिक्षक शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.याच प्रकारचे व्याख्यान आणि कार्यशाळेचे संपूर्ण पाथर्डी तालुक्यातील दुरक्षेत्रामध्ये आयोजन करण्यात आले आहे. पाथर्डी तालुक्यातील सर्व शाळा आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या कार्यक्रमासाठी सर्व बीट हद्दीत हवालदारांना उपस्थित राहण्याचे लेखी आदेशच देण्यात आले आहेत.संबंधित कार्यक्रमाच्या बातम्या व्रुत्तपत्रात प्रसिद्ध करण्याचा दंडकही लावण्यात आला आहे.