सीए फायनल परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा चोपडा महाविद्यालयात सत्कार

सीए फायनल परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा चोपडा महाविद्यालयात सत्कार

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या वतीने नोव्हेंबर 2022 मध्ये ICAI ने घेतलेल्या सी.ए. फायनल परीक्षेत चोपडा महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन संस्था व महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील हे उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.ए.एल.चौधरी, उपप्राचार्य प्रा.डॉ. के.एन. सोनवणे, ज्युनिअर कॉलेजचे सहा.शिक्षक.डी.डी.करंकाळ आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.सी.आर. देवरे यांनी सांगितले की, वाणिज्य विभागातील विद्यार्थी हे अनेक वर्षांपासून चमकदार कामगिरी करत आहेत वाणिज्यची विद्यार्थी ही दरवर्षी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये झळकत आहेत तसेच वाणिज्य विभागाचे अनेक विद्यार्थी हे स्पोर्ट्समध्ये तसेच युवारंग व इतर अनेक कार्यक्रमांमध्ये आपली चुणूक दाखवत आहेत असेच अनेक विद्यार्थी पुढे देखील वाणिज्य विभागामार्फत उत्तुंग यश मिळवतील.
महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे सीए पार्थ महेश अग्रवाल व सीए सुशील रघुवीर भाट या दोन विद्यार्थ्यानी नोव्हेंबर 2022 मध्ये झालेल्या सीए फायनल परीक्षेत उत्तुंग यश मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत.
या कार्यक्रमाप्रसंगी सीए पार्थ महेश अग्रवाल आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे परंतु सोशल मीडिया जितका उपयोगी आहे, तितकाच घातक देखील आहे. पुढे बोलताना ते म्हटले की, मी आजपर्यंत इंस्टाग्राम, फेसबुक यावर अकाउंट ओपन केलेले नाही. म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याने जास्तीत जास्त अभ्यासास वेळ दिला तर यश हे नक्कीच आपल्या हातात असते. विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ध्येय ठेवून जर अभ्यासामध्ये चुणूक दाखवली तर कोणतेही यश संपादन करणे कठीण नाही.
यावेळी सीए. सुशील रघुवीर भाट यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, अनेक अडचणी पार करत करत मला या यशापर्यंत पोहोचता आले. कौटुंबिक अडचणी तसेच इतर आर्थिक अडचणींना देखील सामोरे जावे लागते परंतु जर ध्येय निश्चित ठेवले तर तुम्ही शारीरिक अडचणी,कौटुंबिक अडचणी व इतर सर्वांवर मात करून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकाल.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगताप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील म्हणाले की, आपल्या महाविद्यालयाची परंपरा ही खूप वैभवशाली आहे.आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी हे सीए,एमपीएससी,यूपीएससी तसेच इतर स्पर्धात्मक परीक्षेमध्ये नेहमीच पुढे असतात. त्यामुळे चोपडा महाविद्यालयाचे नाव हे राज्यात काय तर देश पातळीवर देखील उंचावले जात आहे.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. ग्रंथालयामध्ये जास्तीत जास्त वेळ दिला गेला पाहिजे व चांगल्या गोष्टींवर चर्चा घडवून आणली पाहिजे. आपल्या महाविद्यालयामध्ये अनेक सोई सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केलेल्या आहेत,त्याचा जास्तीत जास्त उपयोग विद्यार्थ्यांनी करून घेतला पाहिजे. लायब्ररीचा वापर जास्तीत जास्त करून घ्यावा. तसेच आपल्याकडे अनेक चांगले प्राध्यापक आहेत विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन मिळवून आपले यशाचे ध्येय गाठले पाहिजे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहाय्यक श्री. चेतन बाविस्कर यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी विभागातील सहा.प्रा.सौ.एच.ए.सूर्यवंशी, सहा. प्रा.सौ. पी.एस. जैन, सहा. कु. ए.सी.जोशी यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाप्रसंगी वाणिज्य विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.