जोयाला शिष्यवृत्ती मेरिट लिस्ट मध्ये समाविष्ट करा, गटशिक्षणाधिकारीला निवेदन
जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा पाचोरा येथे इयत्ता सहावी मध्ये शिकणारी जोया मोहसीन बागवान ही मागच्या वर्षी पाचवीच्या वर्गात होती. तिने 9 फेब्रुवारी 2025 रोजी झालेली शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे.दिनांक 9 जुलै 2025 रोजी शिष्यवृत्ती मेरिट मध्ये आलेले विद्यार्थ्यांच्या यादी प्रसिद्ध झाली. 58% च्या वर आलेले विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये समावेश आहे. जोयाने 59.33 टक्के घेऊन ही तिचे शिष्यवृत्ती मेरिट लिस्ट मध्ये नाव समाविष्ट करण्यात आलेले नाही. नाव समाविष्ट करण्यासाठी विद्यार्थिनीचे वडील मोहसीन बागवान यांनी बुधवार रोजी गट साधन केंद्र पाचोरा येथे जाऊन गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती पाचोरा यांना निवेदन दिले. शुक्रवार रोजी मोहसीन बागवान यांनी जिल्हा परिषद जळगाव येथे स्वतःहून जाऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अर्ज दिले होते. शुक्रवार रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जळगाव सचिन परदेशी साहेब कार्यालयीन कामासाठी बाहेर असल्याने यांच्याशी दूरध्वनीवर गोष्टी झाल्याने त्यांनी गटशिक्षणाधिकारी पाचोरा मार्फत कार्यालयाला प्रस्ताव सादर करण्याचे मार्गदर्शन केले.आज बुधवार रोजी उपशिक्षणाधिकारी (योजना) पठाण साहेब यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा झाल्याने त्यांनी पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासित केले. याबाबत ग्रेडेड मुख्याध्यापक एजाज रऊफ यांनी पूर्ण दस्तावेज सह कार्यालयाला माहिती जमा केली.मोहसीन बागवान यांचे म्हणण्यानुसार जोयानी मेरिट लिस्ट मध्ये येण्यासाठी खूप परिश्रम केलेले होते. तिचे नाव मेरिट लिस्ट मध्ये आलेला नसल्याने ती निराश झालेली आहे. मेहनत करून वरिष्ठ अधिकारी होण्याच्या तिचे स्वप्न आहे.मी एक रिक्षा चालक असून आपल्या सेवेत विनंती करतो की जर आपण तिचे नाव शिष्यवृत्ती मेरिट लिस्ट मध्ये समावेश केला तर तिला पुढच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल. निवेदन देतेवेळी मोहसीन बागवान, जावेद रहीम, शिवदे भाऊसाहेब, विशेष शिक्षक तज्ञ बडगुजर साहेब उपस्थित होते.