कासार पिंपळगाव, मीरी गटातून तुतारीला मताधिक्य मिळवून देवू : सौ.राजळेचे राणीताई लंकेंना आश्वासन

कासार पिंपळगाव, मीरी गटातून तुतारीला मताधिक्य मिळवून देवू : सौ.राजळेचे राणीताई लंकेंना आश्वासन

(सुनिल नजन”चिफ ब्युरो”/अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) महाविकास आघाडीचे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे अधिक्रुत उमेदवार निलेश लंके यांना पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव, मीरी गटातून मताधिक्य मिळवून देउ असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा सौ. योगिता राजळे यांनी दिले.त्या लंके यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या प्रचारफेरीत बोलत होत्या. त्यांच्या समवेत सौभाग्यवती राणीताई लंके या आवर्जून उपस्थित होत्या. लंके यांनी कासार पिंपळगाव, हनुमान टाकळी, जवखेडे खालसा या भागात प्रचार दौरा आयोजित केला होता.त्या वेळी सौ राजळे यांनी कासार पिंपळगाव येथे सौ.राणीताई लंके यांचे जोरदार स्वागत करून गावच्या वतीने भगतवस्तीवर भव्य दिव्य नागरी सत्कार केला. हनुमान टाकळी येथे ही काजळे वस्ती वर सौ.लंके यांनी भेट दिली. जवखेडे खालसा, कामत शिंगवे येथे ही सौ लंकेच्या प्रचार फेरीला चांगला प्रतिसाद मिळाला.मतदारांचा उत्साह पाहून सौ.राणी ताई लंके या चागल्याच भाराउन गेल्या. लंकेंचा डंका संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात घुमू लागला आहे. राणीताई लंके यांच्या प्रचार रथाचा वारू महायुतीचे उमेदवार विखे पाटील नेमका कसा रोखतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अटीतटीच्या लढाईत लंके की विखे नेमके कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यामुळे दोन्ही गटात प्रचारात चांगलीच रंगत आल्याचे दिसून येत आहे. विखे की लंके यांच्या विजयावर पैजा पडू लागल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.