पाचोऱ्यातील पाच माजी नगरसेवकांची खटल्यातुन निर्दोष मुक्तता

पाचोऱ्यातील पाच माजी नगरसेवकांची खटल्यातुन निर्दोष मुक्तता

 

 

पाचोरा येथील प्रथमवर्ग न्यायाधीश यांचे न्यायालयात भा.द.वी.कलम 188व लोकप्रतिनिधी कायदा कलम 130,136 प्रमाणे चालु असलेल्या खटल्यातुन पाचोरा नगरपरीषदेचे पाच माजी नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी,गंगाराम पाटील,संजय भिल,अविनाश सावळे व कुसुमबाई पाटील यांची आज दि 11/04/2025 रोजी न्यायाधीश श्रीमती जी.एस.बोरा यांनी निर्दोष मुक्तता केली सदरचा खटला 9 वर्ष असा जुना खटला होता आरोपी तर्फे अँड एस.पी पाटील व अँड.अंकुश कटारे यांनी कामकाज पाहीले तर सरकारी वकील म्हणून ॲड.मीना सोनवणे ह्यानी कामकाज पाहीले.