के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण संपन्न
के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण संपन्न : खान्देश कॉलेज ऑफ एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयांत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला . डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे ,रायगड सौजन्याने महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले . या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .शुद्ध हवा,ऑक्सिजन व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडा शिवाय पर्याय नाही.वृक्ष आपल्याला फक्त पाने,फुलेच देत नाहीत,तर आपल्याला जगण्याची ऊर्जा देतात नवी आशा व उमेद देतात.म्हणूनच वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी यांनी केले. वृक्षारोपण कार्यक्रमाचे वेळी अकॅडमिक डीन डॉ सी एस पाटील ,ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डीन प्रा. गणेश पाटील ,एच आर विभाग प्रमुख प्रा श्रुतिका घरडे तसेच पॉलीटेकनिक ,एमबीए ,अभियांत्रिकी विभाग प्रमुख ,प्राध्यापक वृंद ,शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते . कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा .विजय एन चौधरी यांनी केले.