“वोट” कवितासंग्रहाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या हस्ते प्रकाशन
जळगाव :- कवी लेखक व पत्रकार प्रकाश रामदास तेली यांनी लिहिलेल्या वोट ह्या हिंदी कवितासंग्रहाच्या पहिल्या आवृत्तीचे काल दिनांक २६/०७/२०२२ रोजी श्रीकांत देशपांडे अतिरिक्त मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्या हस्ते व नितीन पाटील यांच्या उपस्थिती काल मंत्रालय मुंबई येथे करण्यात आले
काय आहे वोट काव्यसंग्रहात :-
वोट ह्या काव्य संग्रहात मतदानाचे महत्व पाठवून देणाऱ्या व मतदान जनजागृती अभियानाशी संबधित वेगवेगळ्या शीर्षकाच्या 50 कविता आहेत ह्या सोबतच वोट स वर 300 पेक्षा जास्त कोट्स हे कवी प्रकाश तेली यांनी लिहिलेले आहेत त्याचे हि कौतुक श्रीकांत देशपांडे यांनी केले
मतदानाचे प्रमाण वाढावे म्हणून शासन स्तरावर आणि विविध सामाजिक संस्थांकडून अभिनव प्रयत्न व कार्य सुरू आहे त्यांच्या प्रयत्नांना अधिक चालना मिळावी व मतदान जनजागृती अभियानास अधिक प्रोत्साहन व गती मिळावी ह्या भावनेने या सर्व कविता प्रकाश तेली यांनी लिहिल्या आहेत तेली यांच्या अश्या प्रयत्न व कार्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्यास नक्कीच मदत होईल असे वाचकांनी सांगितले
वोट कविता संग्रहात मतदान प्रक्रियेतील समस्याकडे हि तेली यांनी लक्ष्य वेधले आहे मतदान न केल्याने त्याचे काय परिणाम होतात त्याचे मार्मिक विवरण त्यांनी ह्या काव्यसंग्रहात केले आहे
वोट या कवितासंग्रहातून देशाच्या राष्ट्रीय समस्यावर प्रकाश टाकून त्यात सुधारणा करण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
लेखक परिचय व कोण आहेत प्रकाश तेली :-
प्रकाश रामदास तेली हे एक संवेदनशील कवी, लेखक आणि पत्रकार आहेत.त्यांना विविध सामाजिक आणि राष्ट्रीय विषयांवर कविता लिहिणे आणि समाजाचे प्रबोधन करणे आवडते. त्यांना प्रशासकीय आणि वित्तीय क्षेत्रातील कामाचा अनेक वर्षांचा अनुभव आहे.यापूर्वी त्यांनी SBIL मुंबईच्या विविध कार्यालयांमध्ये वरिष्ठ कार्यकारी म्हणून काम केले आहे.
त्यांना नवनिर्मितीची प्रचंड आवड आहे.त्यांनी विविध सामाजिक समस्या आणि इतर अनेक महत्त्वाच्या विषयांवर चार हजारांहून अधिक कविता आणि पाच हजार हून जास्त कोट्स लिहिले आहेत, कविता संग्रहात खालील काही विषयांचा समावेश आहे
१) भारत – आपल्या भारत देशाची वैशिष्ट्ये सांगण्यासाठी लिहिले आहे
२) फेक न्यूज – फेक न्यूज ने देशाचे नाव आणि वातावरण कसे बिघडवते, व ते थांबवण्यासाठी काय केले पाहिजे यासाठी लिहिले आहे.
३) वीज – वीज बचतीचे महत्त्व आणि वीज बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी लिहिले आहे.
४) अन्न सुरक्षा – अन्नाचा गैरवापर टाळण्यासाठी लिहिले आहे
५) पोलाद – स्वदेशी पोलादाला चालना द्यावी, यासाठी लिहिले आहे.
६) पर्यटन – भारतीय पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि भारतीय पर्यटनाबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.
७) रोजगार – स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी लिहिले आहे
८) राष्ट्रीय संपत्ती – राष्ट्रीय मालमत्तेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी लिहिले आहे.
९) शेतकरी – शेतकऱ्यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
१०) वोट –भारतीय लोकशाही मजबूत कशी करू शकतो यासाठी लिहिले आहे
११) मेहनत – मेहनतीचे महत्व सांगितले आहे
१२) पाणी – पाणी हे अनमोल आहे, पाणी वाचवणे किती महत्त्वाचे आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
१३) पर्यावरण –पर्यावरणाचे महत्त्व आणि पर्यावरणाचा समतोल राखणे किती महत्त्वाचे आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
१४) शिक्षण – शिक्षणाशिवाय जीवन व्यर्थ आहे, शिक्षणाशिवाय देशाची आणि स्वतःची प्रगती शक्य नाही, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
१५) नोबेल – नोबेल पुरस्काराचे महत्त्व सांगितले आहे.
१६) प्राणी, पक्षी आणि जंगले – प्राणी, पक्षी आणि जंगल सुरक्षित ठेवणे किती महत्त्वाचे आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
१७) शांतता – शांततेचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
१८) योगा – योगाचे महत्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
१९) राष्ट्रीय एकात्मता – सर्व जाती धर्मामध्ये बंधुभाव टिकवणे किती महत्वाचे आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
२०) लोकशाही – लोकशाहीछे महत्व सांगितले आहे.
२१) जातीयता – जाती धर्माच्या जखमा किती मोठ्या असतात हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. २२) नदी -नद्यांचे महत्त्व सांगितले आहे.
२३) व्यसन – व्यसन किती हानिकारक आहे, तसेच नशेचे दुष्परिणाम सांगितले आहेत.
२४) रसायनमुक्त भारत – हे रसायनमुक्त भारतासाठी लिहिलेले आहे.
२५) प्रदूषण – प्रदूषण कसे होते, ते कसे थांबवले पाहिजे यासाठी लिहिले आहे.
२६) नैसर्गिक संसाधने – नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे
२७) बालविवाह – बालविवाहचे दुष्परिणाम व बालविवाह थांबविण्याचे आवाहन केले आहे.
२८) बेटी- बेटी बचावला प्रोत्साहन देण्यासाठी लिहिले आहे.
२९) स्वातंत्र्य दिन – भारतीय स्वातंत्र्याचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
३०) स्वच्छता – स्वछतेचे महत्व सांगितले आहे
३१) सौरऊर्जा – सौरऊर्जेचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
३२) राष्ट्रीय आपत्ती – राष्ट्रीय आपत्ती रोखण्यासाठी जनतेचे सहकार्य किती महत्त्वाचे आहे हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
३३) वाढती लोकसंख्या – वाढत्या लोकसंख्येचे दुष्परिणाम अधोरेखित केले आहेत
३४) शासकीय योजना – शासकीय योजनांचा लाभ खर्या लाभार्थ्याना व्हावा यासाठी 10 शासकीय योजनांवर कविता लिहिल्या आहेत
कवी प्रकाश तेली यांचा मोबाईल न. +९१९५७९१११२२२, +९१९८६००४१८५६
Email ID:- prakash.teli@yahoo.com / prakash.teli1@gmail.com
आपणास नम्र विनंती की कृपया सदरची बातमी प्रकाशित करून सहकार्य करावे आपल्या नेहमीच्या सहकार्याबद्दल खूप खूप आभार आपले असेच प्रेम भविष्यात ही राहू द्यावे हि नम्र विनंती
धन्यवाद

















