लोकमत दैनिकाच्या ४८ व्या वर्धापनदिनानिमित्त जळगाव येथे आयोजित “गौरव कर्तृत्वाचा” या सन्मान सोहळ्यात आदरणीय अरविंदभाऊ देशमुख यांचा गौरव करण्यात आला.
आरोग्यदूत म्हणून समाजासाठी अविरतपणे कार्य करणारे, माननीय नामदार गिरीशभाऊ महाजन यांचे निष्ठावंत सहकारी असलेले अरविंदभाऊ देशमुख हे सध्या विकास दूध संस्थेचे संचालक, दैनिक तरुण भारतचे संचालक तसेच जळगाव जिल्हा औद्योगिक संस्थेचे व्हाईस चेअरमन म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.
त्यांच्या सामाजिक, औद्योगिक व सेवाभावी कार्याची दखल घेऊन मिळालेला हा सन्मान अत्यंत गौरवास्पद आहे.
आदरणीय अरविंदभाऊ देशमुख यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

















