केंद्र सरकारच्या वीज (संशोधन) कायदा-२०२१ च्या विरोधात तिन्ही वीज कंपण्यात कार्यरत कामगार,अभियंते,अधिकारी संघटनांचा देशव्यापी संप

केंद्र सरकारच्या वीज (संशोधन) कायदा-२०२१ च्या विरोधात तिन्ही वीज कंपण्यात कार्यरत कामगार,अभियंते,अधिकारी संघटनांचा देशव्यापी संप

केंद्र सरकारच्या वीज (संशोधन) कायदा-२०२१ च्या विरोधात महाराष्ट्रातील तिन्ही वीज कंपण्यात कार्यरत कामगार,अभियंते,अधिकारी च्या २३ संघटनांनी दिनांक १० आगस्ट २०२१ रोजी देशव्यापी संप पुकारला असून संप १०० टक्के यशस्वी होण्यासाठी जळगाव परिमंडळातील सर्व २१ संघटनांची आढावा बैठक दिनांक ०६.०८.२०२१ रोजी जळगाव येथे पार पडली त्यात दिनांक ०९.०८.२०२१ रोजी जळगाव परिमंडळातील सर्व विभाग,मंडळ व परिमंडळ कार्यालय येथे द्वारसभा घेण्याचे व वीज सशोधन कायद्याचे कामगारांवर होणारे विपरीत परिणाम,वीज उद्योगाचे खाजगीकरण धोरण ह्या विषयावर उपविभाग व कक्ष पातळीपर्यन्त संघटनेच्या स्थानिक पदाधिकार्यां नी सर्व कामगारांना जागरूक करून संपाचे वातावरण निर्माण करावयाचे ठरविण्यात आले.जळगाव परिमंडळातील तिन्ही विज कंपनीत कार्यरत सर्व कामगार,अभियंते,अधिकारी यांना आवाहन करण्यात आले की त्यांनी मोठ्या संख्येने संपात सहभागी होवून संप यशस्वी करावा व वीज कंपनीचे होणारे खाजगीकरण थांबविण्यात यावे.
आढावा बैठकीत आर.आर.सावकरे,विरेन्द्र पाटील,विजय सोनवणे,देवेंद्र भंगाळे,सिद्धार्थ लोखंडे,सादीक शेख,मनोज भराडे,संध्या पाटील,दिनेश बडगुजर,योगेश जाधव,प्रभाकर सपकाळे,हिरालाल पाटील इ.पदाधिकारी हजर होते.