पाचोरा रेल्वे स्थानकावर उन्मेष पाटील व करण पवारांचे भव्य स्वागत

पाचोरा रेल्वे स्थानकावर उन्मेष पाटील व करण पवारांचे भव्य स्वागत

*पाचोरा, दिनांक ४ (प्रतिनिधी )* : भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात दाखल झाल्यानंतर जिल्ह्यात पहिल्यांदा येणारे माजी खासदार उन्मेषदादा पाटील व खासदारकीचे उमेदवार करण पवार यांचे पाचोरा रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत करण्यात आले.

या संदर्भातील वृत्त असे की, कालच खासदार उन्मेषदादा पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन मातोश्रीवर शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला. त्यांच्या सोबत पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण बाळासाहेब पवार यांनी देखील हाती शिवबंधन बांधले.

दरम्यान, आज रेल्वेने उन्मेष पाटील व करण पवार हे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत आणि सहकार्‍यांसह रेल्वेने जळगाव येथे दाखल झाले. याआधी पाचोरा रेल्वे स्थानकावर ट्रेन थांबली असतांना स्थानिक पदाधिकार्‍यांनी त्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत केले. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजीने संपूर्ण फलाटासह रेल्वे स्थानक दुमदुमल्याचे दिसून आले. नरेंद्रसिंगदादा सुर्यवंशी आणि राजू भाऊ काळे यांनी पुष्पगुच्छ देऊन उन्मेषदादा आणि करणदादा यांचे स्वागत केले.

याप्रसंगी अनिल सावंत शहर प्रमुख, ज्येष्ठ शिवसैनिक विकास वाघ, दादाभाऊ चौधरी, संजय चौधरी, राजू भैय्या पाटील, संतोष पाटील, खंडू सोनवणे, नामदेव चौधरी, नितीन लोहार, भूपेश सोमवंशी तालुका युवा अधिकारी, हरीश देवरे शहर युवाअधिकारी, मनोज चौधरी शहर युवा अधिकारी, अभिषेक खंडेलवाल, इमरान पिंजारी, सोनू शिंपी, प्रवीण वाघ, संदीप सिसोदिया, भरत पाटील, आणि जिभाऊ पाटील संभाजी ब्रिगेड सह समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.