निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागातील विदयार्थ्यांनी साकारला नृत्याविष्कार

निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागातील विदयार्थ्यांनी साकारला नृत्याविष्कार !

पाचोरा : निर्मल इंटरनॅशनल स्कूलमधील पूर्व प्राथमिक विभागातील विदयार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात मा. तात्यासाहेब आर. ओ. पाटील नगर, पुनगावं रोड, पाचोरा याठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलन *“निर्मल उत्सव”* अतिशय दिमाखदार पध्दतीने सादर केले. प्रथमत: संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय सौ. वैशाली सुर्यवंशी, उपाध्यक्षा कमलताई पाटील, सचिव श्री. नरेंद्रसिंग सुर्यवंशी आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्ज्वलन करण्यात आले व सरस्वतीच्या प्रतिमेस माल्यार्पण करून गणेश वंदनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली.
चिमुरडयांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने उपस्थित जनसमुदाय मंत्रमुग्ध झाला. लहान मुलांच्या नृत्याने सर्व वातावरण आनंदमय झाले होते.
संस्थेच्या अध्यक्षा सौ. वैशाली सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतात शाळेतील सर्व विदयार्थ्यांचे कौतुक केले. विदयार्थ्यांसाठी नैतिक मूल्ये, संस्कार किती महत्वाचे आहेत यासाठी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर लहान मुलांच्या भावविश्वाला आकार देतांना पालकांची भूमिका अतिशय महत्वपूर्ण आहे असे नमूद केले.
यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा कमलताई पाटील, सचिव श्री. नरेंद्रसिंग सुर्यवंशी, निर्मल सिड्सचे सर्व पदाधिकरी, शाळेचे प्राचार्य श्री. गणेश राजपूत, उपप्राचार्य प्रदीप सोनवणे, समन्वयक सौ. स्नेहल पाटील, प्रशासकीय अधिकारी श्री. संतोष पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पूर्व प्राथमिक विभागातील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचा-यांनी अथक परिश्रम घेतले.