दुचाकीचा कट लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून पाचोऱ्यात तरुणाचा खून पाच संशयित ताब्यात

दुचाकीचा कट लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून पाचोऱ्यात तरुणाचा खून पाच संशयित ताब्यात

पाचोरा (वार्ताहर) दि३१
पाचोरा शहरातील गुन्हेगारीने तोंड वर काढले असून शहरातील पुनगाव रोड स्थित बुऱ्हाणी शाळे समोरील मोकळ्या जागेत रविवारी संध्याकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास तरुणांच्या दोन गटात दुचाकीचा कट लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून लाठ्या काठ्या, चॉपर ,फायटरचा वापर करत तुंबळ हाणामारी झाली यात शहरातील पुनगाव रोड लगत असलेल्या दुर्गा नगर भागातील २३ वर्षीय युवक भूषण नाना शेवरे याचा खून झाला असून सनी रवींद्र देवकर वय २३ रा.गाडगेबाबा नगर याचे फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात सकाळी ३ वाजता खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तात्काळ पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान अनेक वर्षांनंतर पाचोऱ्यात खुनाचा गुन्हा घडल्याने खळबळ उडाली असून शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुंडगिरीला चाप लावण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.