राखीला हात द्या बहिणीला साथ द्या

राखीला हात द्या बहिणीला साथ द्या

पाचोरा: रक्षाबंधन हा सण भाऊ- बहिणीच्या प्रेमाच्या धाग्यांना आणखी घट्ट करण्याचा दिवस आपली बहीण सौ. वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी नेत्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी शिवतिर्थ शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात दि. 30 ऑगस्ट 2023 रोजी (बुधवार) रोजी रक्षाबंधनाच्या कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी भाऊ- बहिणीच्या नात्याला बळकटी देण्यासाठी आपण जरूर उपस्थित राहावे. असं आवाहन ताईसो. यांनी पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे. कार्यक्रमाची वेळ पाचोरा कार्यालयात सकाळी 09 ते 12 वाजेपर्यंत आणि  बाळद रोड भडगाव येथील कार्यालयात दुपारी 02 ते 04 वाजेपर्यंत असणार आहे. तर चला मनात उल्हास भरून जाऊया सर्व मिळून प्रेम व विश्वासा सोबत साजरा करूया रक्षाबंधनाचा पवित्र सण.
निस्वार्थपणे प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व प्रिय भावांना, दादांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा