Home महाराष्ट्र पोलिस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांच्या तगड्या पोलिस बंदोबस्तामुळे कानिफनाथ निशाण भेट...

पोलिस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांच्या तगड्या पोलिस बंदोबस्तामुळे कानिफनाथ निशाण भेट यात्रा महोत्सव शांततेत संपन्न

पोलिस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांच्या तगड्या पोलिस बंदोबस्तामुळे कानिफनाथ निशाण भेट यात्रा महोत्सव शांततेत संपन्न

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

संपूर्ण महाराष्ट्रात भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र मढी येथे पाथर्डीचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांच्या तगड्या पोलिस बंदोबस्ता मुळे कानिफनाथ निशाण भेट यात्रा शांततेत संपन्न झाली. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी पैठण येथुन कावडीने पाणी आणले होते.परंतू कोणी कधीही नाथांच्या समाधीवर गंगेचे पाणी टाकले तरी कासार पिंपळगाव,मढी, सुसरे,माळी बाभुळगाव, तागडखेल आणि सावरगाव(एकत्र) या प्रमुख पाच मानाच्या कावडी निशाण घेऊन वाजत गाजत लक्ष्मीमाता मंदिर चौकात येताच पाथर्डीचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी स्थानिक पोलीसांना पाचही मानाच्या काठ्याचे निशाण एकत्र जुळवून हातात घेण्याच्या सूचना केल्या. पोलीसांनी सदर पाचही कावडीचे निशाण हातात घेऊन थेट कानिफनाथ गडावरून छबिना मिरवणूकीतून आलेल्या नाथांच्या पितळी घोड्याला स्पर्श होताच तोफांच्या सलामीत आणि रेवडी फुलांच्या वर्षावात कानिफनाथ महाराज की जय चा जयघोष करण्यात आला. पाथर्डीचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी साहेब, पोलिस उपनिरीक्षक संदिप ढाकणे, जाधव, आगरकर, लक्ष्मण पवार,ए एस आय दराडे,पी.एन. धोत्रे,शेवगाव येथील पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार देवीदास वाघमारे,पोलिस हवालदार अरवींद चव्हाण,नेताजी मरकड,आणि अहिल्यानगर येथील रॅपिड ऍक्शन फोर्स यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.निशाण भेटीच्या वेळी कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे सर्व विश्वस्त मंडळ यावेळी उपस्थित होते.रात्री मालती इनामदार नारायण गावकर यांच्या लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते.निवडुंगे येथील रस्त्याने मढी गडाकडे प्रवेश आणि तिसगाव रस्त्याने बाहेर पडण्याचा मार्ग असल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत चालू होती.नविन विश्वस्त मंडळाने कारभार हाती घेतल्या नंतर ही पहिलीच यात्रा असल्याने यात्रेत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही.भाविकांचे दागिने चोरणाऱ्या चारदोन महिलांना पकडून पाथर्डी पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एकंदरीत हा फुलोरबाग यात्रा महोत्सव शांततेत संपन्न झाला.

Don`t copy text!