श्री.गो. से.हायस्कूल पाचोरा येथे स्काऊट गाईड चे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांची जयंती साजरी

श्री.गो. से.हायस्कूल पाचोरा येथे स्काऊट गाईड चे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांची जयंती साजरी

पाचोरा ( प्रतिनिधी)
श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथे स्काऊट गाईड चे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेस शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पी. एम. वाघ यांनी पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक आर. एल. पाटील ,ए. बी. अहिरे ,कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर, ज्येष्ठ शिक्षक एस. एस. दत्तू , शाळेचे स्काऊट गाईड प्रमुख आर. बी कोळी ,तसेच शाळेतील इतर स्काऊट गाईड शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.