लोकसभेच्या निवडणुकीची तुतारी वाजली,संभाव्य मतदान तारीख १६ एप्रिल २०२४ जाहीर 

लोकसभेच्या निवडणुकीची तुतारी वाजली,संभाव्य मतदान तारीख १६ एप्रिल २०२४ जाहीर

(सुनिल नजन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) संपूर्ण भारत देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीची तुतारी अखेर वाजली असुन मतदानाची सांभाव्य तारीख १६ एप्रिल २०२४ ही निश्चित करण्याच्यादृष्टीने प्रशासकीय यंत्रणेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्य निवडणुक अधिकारी टी.मिसाओ यांनी दिल्ली येथे एक प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे.त्या पत्रात त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या सुरूवात आणि शेवटच्या तारखे संदर्भात माहिती दिली आहे.त्या पत्रात त्यांनी लोकसभा निवडणुकीची सांभाव्य तारीख १६ एप्रिल २०२४ ही तात्पुरती ग्रुहीत धरुनच पुढील अधिसूचना जारी करण्याचे निर्देश दिले आहेत.त्यामधे निवडणुकी पर्यंतचा क्रियाकलाप सर्व कालावधी नमुद करण्यात आला आहे. त्याच बरोबर हेही कळवले आहे की प्रत्येक उपक्रमात प्रारंभ आणि समाप्तीच्या तारखेला निवडणूक आयोग पोर्टल वरुन सी.ओ.दिल्ली यांना एस एम एस आणि ईमेल आयडी द्वारे अधिसूचना पाठवून देईल.मग सी.ई.ओ.मुख्यालयातील डी.ई.ओ.एस./आर.ओ.आणि संबंधित निवडणुक शाखांमधून निवडणुकी संदर्भात प्राप्त झालेल्या अहवालावर चर्चा करून चिन्हांकित केले जाईल आणि निवडणूक नियुक्त अधिकारी आणि सेंन्थामधे नमुद केलेल्या प्रत्येक निवडणुकीतील क्रियाकलापास सुरुवात आणि पुर्ण करण्या साठीच्या कालमर्यादेचे कडेकोट पणे पालन केले जाईल असे संबंधित पत्रात निर्देश देण्यात आले आहेत. coebranch2024@gmail.com या ईमेलायडीवर सीईओ शाखा,सीईओ कार्यालय, दिल्ली येथे कळवावे अशी संबंधित प्रसिद्धी पत्रकात विनंती करण्यात आली आहे.सोळा एप्रिल ही तारीख निश्चित करण्याचे अधिसूचित केले आहे.या तारखेत काही थोड्या फार दिवसांचा बदलही होउ शकतो शेवटचा निर्णय हा मुख्य निवडणूक आयोगाचा अंतिम निर्णय राहणार आहे.