पाचोरा व भडगाव तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सहाय्यक साहित्यासाठी तपासणी शिबीराचे आयोजन

पाचोरा व भडगाव तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सहाय्यक साहित्यासाठी तपासणी शिबीराचे आयोजन

मा. श्री. किशोर आप्पा पाटील, आमदार पाचोरा व भडगाव यांच्या आमदार विकास निधीतुन पाचोरा व भडगाव तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना आवश्यक सहाय्यक साहित्य उपकरणे उदा. तिनचाकी सायकल, व्हीलचेयर, कुबड्या, वॉकर, काठी, जयपुर फुट, कॅलीपर्स, कर्णयंत्रे इ. उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
सहाय्यक साहित्य वाटपापुर्वी संबधीत दिव्यांग व्यक्तींची तपासणी व मुल्यमापन शिबीराचे आयोजन खालील प्रमाणे करण्यात येत आहे.

1) दि. 13 ऑगष्ट 2021 रोजी सकाळी 10 वाजता शिवसेना कार्यालय, भडगाव
2) दि. 14 ऑगष्ट 2021 रोजी सकाळी 10 वाजता महालपुरे मंगल कार्यालय, पाचोरा

वरील तपासणी शिबिरातंर्गत लाभार्थ्यांची तपासणी झाल्यानंतरच पात्र दिव्यांग व्यक्तीस साहित्य उपलब्ध करण्यात येईल. तरी वरील प्रमाणे पाचोरा तालुक्यातील व्यक्तींनी पाचोरा येथे व भडगाव तालुक्यातील व्यक्तींनी भडगाव येथील शिबीरातच उपस्थित रहावे असे आवाहन मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या वतीने करण्यात येत आहे.

शिबीराच्या ठिकाणी येतांना खालील कागदपत्रे आणणे आवश्यक आहे.

1) दिव्यांगाचे प्रमाणपत्राची 4 झेरॉक्स प्रत
2) आधार कार्डच्या 4 झेरॉक्स प्रत
3) 4 फोटो