चोपडा महाविद्यालयात १२ जानेवारी रोजी भव्य युवा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

चोपडा महाविद्यालयात १२ जानेवारी रोजी भव्य युवा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील महाविद्यालयात
महात्मा गांधी शिक्षण मंडळ, संस्थेच्या वतीने दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ७.०० वाजता क्रीडा सप्ताहानिमित्त भव्य ‘युवा मॅरेथॉन स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उदघाटन चोपडा येथील चोपडा शहरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के.के पाटील तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुरेश पंढरीनाथ पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील व संस्थेच्या सचिव डॉ. सौ. स्मिताताई संदीप पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेमध्ये संस्थेच्या विविध शाखांमधील सर्व मुले व मुली विद्यार्थी तसेच पुरुष व महिला शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सहभाग घेता येईल. सदर स्पर्धा महाविद्यालयाच्या मैदानावर होणार असून यामध्ये मुले व मुली यांच्यासाठी ०५ कि. मी. अंतर आणि पुरूष व महिला यांच्यासाठी ०३ कि. मी. अंतर राहील. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम मुले व मुली या स्पर्धकाला प्रथम -रुपये २१००/- रोख, प्रमाणपत्र व ट्रॉफी, द्वितीय पारितोषिक रुपये १५००/- रोख, प्रमाणपत्र व ट्रॉफी व तृतीय पारितोषिक रुपये १०००/- रोख, प्रमाणपत्र व ट्रॉफी अशी पारितोषिके देण्यात येतील. तरी संस्थेच्या अंतर्गत विविध शाखांच्या विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक- शिक्षकेतर बंधू भगिनींनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए. सूर्यवंशी तसेच उपप्राचार्य प्रा. डॉ.ए. एल. चौधरी, उपप्राचार्य एन.एस. कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.एस.ए. वाघ, युवा रन मॅरेथॉन स्पर्धेच्या समन्वयक व क्रीडा संचालक डॉ. के.एस.क्षीरसागर व क्रीडा शिक्षक अमोल पाटील यांनी केले आहे.