Home जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,जळगाव येथे कार्यरत रविंद्र धोंडू घुगे यांना पोलीस महासंचालक पदक...

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,जळगाव येथे कार्यरत रविंद्र धोंडू घुगे यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,जळगाव येथे कार्यरत पोहेकॉ/०३९९ श्री.रविंद्र धोंडू घुगे यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर झाल्याबद्दल ला.प्र.वि.जळगाव विभागातर्फे मा.शशिकांत एस.पाटील, पोलीस उप अधिक्षक यांनी केलेला सत्कार-

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे कार्यरत असलेले पोहेकॉ/०३९९ श्री.रविंद्र धोंडू घुगे यांची पोलीस दलातील कामगिरी अतिउत्कृष्ट व गौरवपुर्ण असून त्यांची आजपर्यंत झालेल्या एकुण सेवा कालावधीमध्ये त्यांना १९५ बक्षिसे, ०९ प्रशंसा पत्रके व एकुण १० अतिउत्कृष्ट अभिप्राय मिळालेले आहेत. त्यांच्या या कामगिरीचा यथोउचित सन्मान म्हणून त्यांना *मा.पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह* जाहीर झाल्याने त्यांना मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मा.श्री.एन.एस.न्याहळदे साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मा.श्री.नरेंद्र पवार साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यात.
तर *मा.पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह* जाहीर झाल्याने पोहेकॉ/०३९९ श्री.रविंद्र धोंडू घुगे यांचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव कार्यालयात मा.श्री.शशिकांत एस.पाटील,पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. जळगांव यांनी सत्कार केला सदर कार्यक्रमास पोलीस निरीक्षक श्री.संजोग बच्छाव,ला.प्र.वि. जळगांव
व ला.प्र.वि.जळगाव घटकातील सर्व पोलीस अंमलदार उपस्थित होता.

Don`t copy text!