पाचोऱ्यात ८ रोजी आदिवासी मेळावा विविध शासकीय योजनांचा सुमारे ३ हजार जणांना मिळणार लाभ : आ. किशोर पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

पाचोऱ्यात ८ रोजी आदिवासी मेळावा
विविध शासकीय योजनांचा सुमारे ३ हजार जणांना मिळणार लाभ : आ. किशोर पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

पाचोरा(वार्ताहर) दि,५
पाचोरा व भडगाव तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांसाठी विविध योजनांसंदर्भात भव्य आदिवासी मेळाव्याचे पाचोऱ्यात ८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता मोंढाळे रोडवरील तुळजाई जिनिंग याठिकाणी करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या संदर्भात ४ जानेवारी रोजी सकाळी ११:३० वाजता पाचोरा उपविभागीय अधिकारी कार्यालयात आ. किशोर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार किशोर पाटील उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसिलदार संभाजी पाटील, गटविकास अधिकारी मधुकर वाघ, एम. एस. भालेराव, भडगाव तालुका कृषी अधिकारी पी. के. बागले, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे नायब तहसिलदार एस. आर. कुंभार भडगाव येथील नगर पालिकेचे मुख्याधिकारी रविंद्र लांडे, कृषी विभागाचे विस्तार अधिकारी राजकुमार धस, भडगाव येथील मंडळ अधिकारी वृशाली सोनवणे, अमोल भोई, प्रशांत माहुरे, पुरवठा विभागाचे अभिजित येवले, पुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर अमृतकर, संजय गांधी निराधार योजनेचे भरत परदेशी, एकलव्य संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकर वाघ, तालुका अध्यक्ष गणेश वाघ, भडगावचे तहसिलदार मुकेश हिवाळे, नगरपालिकेचे अर्जुन भोळे, भडगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गणेश पाटील, मंडळ कृषी अधिकारी पी. एन. खाडे, कृषी विभागाचे सचिन भैरव, प्रविण ब्राम्हणे, आमदार किशोर पाटील यांचे स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील, यांचेसह विविध विभागांचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
केंद्र व राज्य शासनातर्फे आदिवासी समाजातील अनुसूचित जमाती वर्गातील लाभार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. सन – २०२३ / २०२४ या कालावधीत पाचोरा व भडगाव तालुक्यातील मंजुर झालेल्या आदिवासी बांधवांना थेट लाभ याठिकाणी देण्यात येणार असुन विविध योजनांसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी भव्य अशा मेळाव्याचे आयोजन ८ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. या मेळाव्यात केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांचे स्टाॅल लावण्यात येणार आहे. या मेळाव्यात सुमारे ३ हजार लाभार्थी उपस्थित राहणार असुन मंजुर झालेल्या लाभार्थ्यांना जातीचे दाखले, रेशन कार्ड, शबरी घरकुल योजना, गोठा शेड, निराधार योजना, दिव्यांगासाठी योजना, पी. एम. स्व निधी योजना, दिनदयाळ बचत गट योजना या योजनांसह विविध योजनांसंदर्भात मोलाचे मार्गदर्शन तसेच पात्र लाभार्थ्यांना थेट लाभ याठिकाणी देण्यात येणार आहे. या मेळाव्यास जास्तीत जास्त आदिवासी समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रशासनातर्फे उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांचेसह आ.किशोर पाटील यांनी केले आहे.