निपुण भारत साक्षरता अभियान अंतर्गत श्री .गो.से हायस्कूल पाचोरा येथे शिक्षक पालक सभा उत्साहात संपन्न

निपुण भारत साक्षरता अभियान अंतर्गत श्री .गो.से हायस्कूल पाचोरा येथे शिक्षक पालक सभा उत्साहात संपन्न

पाचोरा ( प्रतिनिधी)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था. संचलित श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा. येथे सकाळी 11 वाजता निपुण भारत साक्षरता अभियान अंतर्गत शिक्षक -पालक सभा संपन्न झाली यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला एम वाघ .यांनी निपुण चाचणी एक व निपुण चाचणी दोन यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये झालेली गुणात्मक वाढ विषयी माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांमधील पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान वाढवण्यासाठी स्वतंत्र वर्ग सुरू करण्यात आले यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया निश्चित भक्कम होईल तसेच पालकांनाही आपल्या पाल्यांबाबत सूचना देण्यात आल्या शाळेचे उपमुख्याध्यापक एन.आर.ठाकरे. यांनी शाळेच्या शैक्षणिक दर्जांमध्ये झालेली वाढ तसेच विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास ,आरोग्य समस्या याविषयी माहिती दिली तसेच पालकांच्या सूचनेचे व समस्यांचे निरसन केले. सौ ए. आर.गोहिल यांनी सूत्रसंचालन केले व आर. बी. बोरसे .सर यांनी आभार मानले.या चर्चासत्रा मध्ये पालकांनीही सहभाग नोंदवून काही सूचना व समस्या मांडल्यानंतर त्यांचे निरसन करण्यात आले सभा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्रीमती एस एस पाटील रुपेश पाटील .सौ वी एस कुमावत . कलाशिक्षक प्रमोद पाटील यांचे सहकार्य लाभले.