श्री.गो.से.हायस्कूल पाचोरा येथे 1 मे “महाराष्ट्र दिन” उत्साहात साजरा
आज 1 मे 2026 शुक्रवार रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त तथा कामगार दिनानिमित्त विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री.एन.आर.पाटील सर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यापूर्वी राष्ट्रीयगीत वंदे मातरम संगीत शिक्षक श्री सागर थोरात यांनी म्हटले. त्यानंतर ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली गेली. राष्ट्रध्वज फडकविल्यानंतर राष्ट्रगीत व राज्य गीत म्हणण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एन. आर.पाटील, उपमुख्याध्यापक श्री.आर.एल पाटील, पर्यवेक्षक श्री.आर.बी.बंठिया, पर्यवेक्षिका सौ.ए.आर. गोहिल मॅडम,पर्यवेक्षक श्री.एम.टी.कौंडिण्य, किमान कौशल्य विभाग प्रमुख श्री.मनीष बाविस्कर,श्री.एस. एन.पाटील, क्रीडा विभाग प्रमुख श्री.एस.पी.करंदे, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.आर.बी. बोरसे, कार्यालयीन अधीक्षक श्री.अजय सिनकर यांचे सह सकाळ व दुपार सत्रातील सर्व शिक्षक बंधू-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, इयत्ता 5वी ते 9वीचे विद्यार्थी- विद्यार्थिनी तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.























