पाचोरा महाविद्यालयात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी

पाचोरा महाविद्यालयात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी

 

पाचोरा दि. 14 – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 132 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यानिमित्त पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. श्री. नानासाहेब संजय वाघ यांच्या शुभहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन मा. श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी, कनिष्ठ महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन मा. श्री. नानासाहेब सुरेश देवरे, संस्थेचे ज्येष्ठ संचालक मा. श्री. अप्पासाहेब सतीश चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रा. डॉ. शिरीष पाटील, माजी प्राचार्य मा. डॉ. भी. ना. पाटील, उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा. प्रा. जी. बी. पाटील, पर्यवेक्षक मा. प्रा. एस. एम. पाटील, प्रा. डॉ. जे. डी. गोपाळ, प्रा. एस. एस. पाटील, डॉ. जे. पी. बडगुजर, प्रा. नितीन पाटील, डॉ. अतुल सूर्यवंशी, प्रा. महेश महाजन, डॉ. सुनीता गुंजाळ, डॉ. के. एस. इंगळे, डॉ. एस. बी. तडवी, प्रा. वाय. बी. पुरी, प्रा. आर. बी. वळवी, डॉ. माणिक पाटील, प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. अतुल पाटील, श्री. विजय पाटील, श्री. ऋषिकेश ठाकूर, ॲड. महेश पवार, श्री. सतीश देशमुख, श्री. विजय सोनजे, श्री. अभिषेक जाधव, प्राध्यापक-प्राध्यापिका व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. के. एस. इंगळे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. सुनील नवगिरे, श्री. रवींद्र कदम, श्री. रवींद्र चौधरी, श्री. सुरेंद्र तांबे, श्री. जावेद देशमुख, श्री. उमेश माळी, श्री. बी. जी. पवार, श्री. संतोष महाजन यांनी परिश्रम घेतले.