अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोबदल्यासाठी पाठपुरावा
सोयगाव /दत्तात्रय काटोले
सोयगाव तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले होते. घोसला, तिडका, बोरमाळ तांडा, नांदगाव आदी गावांतील शेतजमीन खरडून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी आणि पुरवणी यादी मंजूर करून निधी तातडीने वितरित करावा, या मागणीसाठी जि.प. सदस्या सौ. पुष्पाताई काळे यांनी पुढाकार घेतला.
यासाठी त्यांनी जामनेर येथे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या वेळी त्यांनी नुकसानग्रस्त भागांची सविस्तर माहिती देत शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या. संबंधित मागण्यांवर मंत्री महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रकरणाची माहिती घेऊन त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
या भेटीवेळी तेजस्विनी ताई काळे (जिल्हा चिटणीस), सुनील गावंडे, नगरसेवक राजेंद्र जावळे, मयुर मनगटे, प्रमोद पाटील (शहराध्यक्ष), मंगेश सोहनी, सरपंच संजय आगे, विजय गव्हाड तसेच घोसला येथील किशोर पाटील, समाधान पाटील आदी उपस्थित होते.
फोटो, दत्तात्रय काटोले
























