ना.बावणकुळे साहेब गंगापूर मध्ये महसूल सप्ताहाचे तिनतेरा वाजले,आमदार निधीतून झालेला रस्ता खाजगी इसमाने उखडून टाकला,शेतकऱ्यांच्या उपोषणाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब म्हणतात शिवरस्ते,पाणंद रस्ते, शेत रस्ते हे महसूल सप्ताहात दुरुस्त करा आणि शेतकऱ्यांना बाराफुट रूंदीचे शेतरस्ते तयार करून द्या. असे आदेश दिले असतानाही संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील कायगाव येथील गट नंबर ९८ मधील नजन वस्ती ते अहिल्यादेवी बारव येथे जाणारा शिवरस्ता हा भाजपचे गंगापूर विधानसभेचे आमदार प्रशांत बंब यांच्या विकास निधीतून मंजूर झालेला सरकारी शिवरस्ता आहे.या रस्त्याच्या कडेला जवळपास राहणाऱ्या एका शेतकऱ्याच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे हा शिवरस्ता बंद पडला आहे.संबंधित शेतकऱ्यांने नवीन तयार करण्यात आलेला सरकारी शिवरस्ता जेसीबी मशीनच्या सहाय्याने दिनांक १० जुलै २०२५ रोजी पुर्णपणे उखडून टाकला आहे.त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची, शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी,प्रवासी, नागरिक यांची अत्यंत गैरसोय होत आहे.हा रस्ता दुरुस्त करावा यासाठी कायगाव टोका या गावातील धनगर समाजातील सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब श्रीधर नजन यांनी आपल्या कुटुंबातील सदस्य आणि इतर अन्यायग्रस्त शेतकरी ग्रामस्थ यांच्या सह गंगापूर येथिल नवीन तहसीलदार कार्यालया समोर पुन्हा दुसऱ्यांदा ४ऑगष्ट पासून आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे.सुरुवातीचे पहिले उपोषण हे दिनांक २२जुलै२०२५ रोजी केले होते परंतु गंगापूर तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार यांनी कसुन चौकशी करण्याचे खोटेच तोंडी आश्वासन देऊन उपोषण सोडविण्यास भाग पाडले होते.त्यांच्या या रस्ता दुरुस्तीच्या खोट्या आश्वासनाला बळी पडून उपोशनार्थींनी उपोषण मागे घेतले परंतु त्यांच्या आश्वासना प्रमाणे रस्ता दुरुस्त झाला नाही.आणि रस्त्याच्या कामासाठी कोणत्याही प्रकारची ठोस अशी उपाययोजना केली नाही म्हणून आम्ही सर्व उपोशनार्थींनी पुन्हा १५जुलै २०२५रोजी दुसरी नोटीस देऊन सोमवार दिनांक ४ऑगष्ट २०२५ पासून गंगापूर नवीन तहसीलदार कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केलेले आहे.राज्याचे महसुलमंत्री माननिय नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाराफुट रूंदीचे शेतरस्ते तयार करण्याचे आदेश दिलेले असताना ही गंगापूर तहसीलदार कार्यालयातील अधिकारी महसूल मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत फक्त सात फूट रुंदीचा रस्ता देण्यात येईल असे बेजबाबदार पणे सांगत आहेत.रस्ता फोडणाऱ्या शेतकऱ्यांनी गटबाजी करून संबंधित तहसीलदार यांच्यावर दबाव आणून सदर रस्त्याच्या कामात खोडा घातला आहे.सदर रस्त्याने उसाने भरलेला ट्रक आणि शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी विद्यार्थी बस सुरक्षितपणे गेली पाहिजे असे उपोषणास बसलेल्या उपोशनार्थीचे म्हणणे आहे.सरकारी नियम धाब्यावर बसवून सारा गैरकारभार सुरू आहे.संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आणि या भागातील भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांनी या प्रकरणात लक्ष घालून संबंधित अंन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी संबंधित शेतकऱ्यांची मागणी आहे.अंन्यथा या रस्त्याच्या गैरकारभारा बाबद महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवून लक्षवेधी सूचना मांडून न्याय मागितला जाईल असे अंन्यायग्रस्त जनतेचे म्हणणे आहे.धनगर समाजाचे भाजपचे २८८ जत विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर आणि महाराष्ट्र राज्याच्या विधान परीषदेचे सभापती नामदार रामजी शिंदे साहेब यांनी या अहिल्यादेवी होळकर यांच्या बारवा पर्यंतच्या रस्त्याच्या कामात लक्ष घालावे अशी गंगापूर तालुक्यातील मेंढपाळाची मागणी आहे.सरकारी रस्ता खोदणारा डांबरट शेतकरी हा एका आमदाराचा नातेवाईक असल्यामुळे गंगापूर तहसीलदार हे या कामाबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे.संभाजी नगर जिल्ह्याचे खासदार संदिपान भुमरे पाटील यांनीही या कामात लक्ष घालावे अशी गंगापूर तालुक्यातील शेतकरी मतदारांची मागणी आहे.या उपोषण आंदोलनामुळे शालेय विद्यार्थ्यांना शाळा बुडवून या उपोषणाला बसावे लागले आहे.संभाजीनगर महसूल विभागातील जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन या रस्त्याचे काम सुरू करून संबंधित शेतकऱ्यांची होणारी गैरसोय टाळावी असे उपोषणास बसलेल्या शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे.या उपोषणावर तोडगा न निघाल्यास राज्यातील सर्व प्रकारच्या संघटना या आंदोलनात सहभागी होतील आणि मग होणाऱ्या परिणामांची जबाबदारी ही शासनावर राहील याची महसूल विभागाने नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर हे उपोषण सोडविण्यास प्रयत्न करावेत.अंन्यथा राज्यव्यापी संघर्ष अटळ आहे.























