Home महाराष्ट्र प्रत्येक गावातील गायरान जमिनी या मत दिलेल्या लाचार पुढाऱ्यांनी खाल्ल्या: ह.भ.प. राम...

प्रत्येक गावातील गायरान जमिनी या मत दिलेल्या लाचार पुढाऱ्यांनी खाल्ल्या: ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के 

प्रत्येक गावातील गायरान जमिनी या मत दिलेल्या लाचार पुढाऱ्यांनी खाल्ल्या: ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के

 

 

 

(सुनिल नजन चिफब्युरो स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

प्रत्येक गावातील गायरान जमिनी या मत दिलेल्या लाचार पुढाऱ्यांनी खाल्ल्या आहेत असा आरोप अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथिल जोग महाराज वारकरी आश्रमाचे महंत ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के यांनी केला.ते शेवगाव तालुक्यातील वाघोली येथे संत सदगुरू वै.यादव बाबा वाघोलीकर यांच्या ४९ व्या पुण्यतिथी निमित्ताने झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील काल्याच्या किर्तना प्रसंगी बोलत होते.झिंजुर्के महाराज पुढे म्हणाले की आता समाजाने जागृत होऊन एकत्र कसे राहू असे वागावे.आता समाजाला जातीयतेचे ग्रहण लागले आहे.यातून समाज कधी बाहेर पडेल हे देवालाच ठाऊक आहे.जातीयता पाळणारे हे तुकोबांच्या कोपाला नक्कीच पात्र होतील.परमार्थ व भक्ती कमी व्हावी हे पापी माणसाचे विचार असतात. ही किर्तन सेवा म्हणजे यादव बाबांच्या चरणी आहुती होय.भगवंत, भक्ती आणि संतांची अवस्था ही सर्व सामान्य लोकांना समाजत नाही.भगवंताच्या भक्तांची आतापर्यंत उपेक्षाच होत आली आहे.त्यांना वाळीतच टाकण्यात आले आहे.भगवंताचे दर्शन झाले की माणूस देहभान विसरतो माणसाला देहाचा विसर पडतो.जे भगवंताच्या कृपेला पात्रं झाले त्यांना त्रासच झाला.संतांची आता पर्यंत उपेक्षाच झाली आहे.नकली लोकांना हसले पाहिजे पण आज जे असली आहेत त्यांनाच लोक हसतात.ज्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल त्याला समाजाची निंदा नालस्ती सहन करावीच लागते.ज्या देहाची निंदा नालस्ती होते तेवढा माणूस देवा जवळ जातो.असे झिंजुर्के महाराज यांनी नाठाळावर ताषेरे ओढताना सांगितले.या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्या निमित्ताने सर्व ह.भ.प.हंसराज मगर,बाबागीरी महाराज, शिवनाथ मैंदड, हनुमंत महाराज, भगवान मचे, निवृत्ती महाराज मतकर,भालसिंग महाराज वाघोलीकर, भगवान जंगले यांची किर्तने झाली.काल्याच्या महा प्रसादाच्या पंगतीने या सोहळ्याची सांगता झाली.वै.यादव बाबा वाघोलीकर यांचा पुढील वर्षीचा सोहळा हा पन्नासावा सप्ताह असल्याने फार मोठ्या प्रमाणात त्याची व्याप्ती असणार आहे.त्याची तयारी आता पासूनच सुरु झाली आहे.या सोहळ्यास वाघोली पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.गुरूवर्य ह.भ.प. भाऊसाहेब महाराज भालसिंग यांच्या अधिपत्या खाली हा सोहळा संपन्न झाला.

Don`t copy text!