बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या अर्चना कुटे यांना ईडी कडून अटक, अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक मल्टीस्टेट क्रेडिट संस्थेच्या घोटाळे बाजांना अटक करणार कधी! ठेवीदारांच्या तक्रार दाखल न करणाऱ्या पोलिस प्रशासनाच्या विरोधात टोल फ्री क्रमांकावर तक्रारीचा पाउस ?
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीने ठेवीदारांच्या ठेवी मुदत संपल्यानंतर परत न दिल्याने सदर संस्था एका मोठ्या आर्थिक घोटाळ्यामुळे चर्चेत आली आहे.या मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी वर हजारो गुंतवणूक दारांची फसवणुक केल्याचा आरोप असुन अंमल बजावणी संचालनालय,(ईडी आणि सीआयडी) द्वारे तपास सुरू आहे.या ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीची सध्याची सत्य परिस्थिती अशी आहे. की या संस्थेवर सुमारे ४ लाख ठेवीदारांच्या साधारण ३५०० ते ३७०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.या ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष सुरेश कुटे आणि त्यांच्या पत्नी सौ अर्चना कुटे यांना अटक करण्यात आली असून ते सध्या पोलिस कोठडीत आहेत.ईडीने आतापर्यंत या संस्थेची आणि कुटे ग्रुपची १४३३ कोटी रुपयांहून अधिक किंमतीची मालमत्ता जप्त केली आहे.या मध्ये जमिन, औद्योगिक भुखंड,आणि इतर स्थावर मालमत्तेचा समावेश आहे.महाराष्ट्र राज्य सरकार एम.पी.आय.डी.कायद्या अंतर्गत (महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इस्टेट ऑफ डेपो सीटर) मालमत्ता निलावासाठी प्रस्ताव मंजूर केला आहे.जप्त केलेल्या मालमत्तेच्या निलावातून जमा होणारा पैसा ठेवीदारांना पुन्हा परत करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.ज्या ठेवीदारांनी अजुनही तक्रार दाखल केलेली नाही त्यांनी संबंधित पोलिस स्टेशनमध्ये किंवा आर्थिक गुन्हे शाखेकडे आपल्या ठेवीच्या पुराव्यासह तक्रार नोंदवून घेणे आवश्यक आहे. परंतु अहिल्या नगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या कार्य क्षेत्रातील पोलिस हे ठेवीदारांच्या तक्रारी नोंदवून घेत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्या विरोधात ही काही ठेवीदारांनी टोल फ्री क्रमांकावर पोलिसांच्या विरोधात वरीष्ठांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.ज्ञानराधा संस्थेतील ठेविदारांच्या ठेवीचे पैसे वाटप झाल्याच्या अफवांवर विश्वास ठेवून कोणत्याही अफवांना बळी पडू नका तिकडे दुर्लक्ष करावे असे आवाहन करण्यात येत आहे.सरकारची अधिकृत घोषणा किंवा कोर्टाच्या आदेशाची प्रतीक्षा करावी.या प्रकरणाचा तपास ईडी,सीआयडी करीत असल्याने अधिकृत माहिती साठी महाराष्ट्र शासन किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. महाराष्ट्रातील ५१ हुन अधिक शाखांमधून कुटे व्यवस्थापनाने उच्च परताव्याचे आमिष दाखवून ठेविदारांचे पैसे बुडवल्याचा आरोप आहे.ठेविदारांचे पैसे मुदत संपलेली असताना ही वेळेवर न दिल्यामुळे त्यांची फसवणूक झाल्याचे लोकांच्या उशिरा लक्षात आले होते.ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी प्रकरणात आता ईडीने फार मोठी कारवाई केली आहे.आर्थिक व्यवहार आणि मनीलॅंड्रीग प्रकरणी अर्चना कुटे यांना ६ मार्च रोजी ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यांना ७ मार्च पर्यंत ईडीची कोठडी देण्यात आली आहे.त्यांना मुंबई येथील विषेश न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. तेव्हा ही कोठडी सुनावण्यात आली.मे ते जुलै २०२४ या सालात महाराष्ट्रातील अनेक पोलिस स्टेशनमध्ये ठेविदारांच्या फसवणूकी झाल्याच्या केसेस दाखल करण्यात आलेल्या आहेत.पैशाची गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदारांना बारा ते चौदा टक्के परताव्याचे आमिष दाखवून ठेवी गोळा केल्याचा कुटे समुहावर आरोप आहे.ईडी संचालना लयाने या प्रकरणाचा तपास केला असता सुमारे २४६७ कोटी रुपयांचा निधी कुटे समुहाने ईतर संबंधित कंपन्यांकडे कर्जाच्या नावाखाली वळविण्यात आल्याचे दिसून आले आहे.तसा खुलासा ही त्यांच्या कडून करण्यात आला आहे.ईडीने असा आरोप केला आहे की आवश्यक ती कागदपत्रे,तारण, किंवा निधीचा उद्देश नसतानाही व्यवहार केल्याचा निष्कर्ष काढला आहे.सुरेश कुटे यांना ईडीने यापूर्वीच अटक केलेली आहे.आणि विषेश न्यायालयात त्यांच्या विरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.मग ईडीने आज पर्यंत अनेक ठिकाणी धाडी टाकून १,६२१.८९ कोटी रुपयांची चल अचल मालमत्ता जप्त केली आहे. याच प्रकारे अहिल्या नगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील अनेक गावांत अनेक मल्टीस्टेट को ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी मध्ये महा घोटाळे झालेले दिसुन येत असुन त्या ठेविदारांची अवस्था ही ज्ञानराधाच्या ठेविदारांची जी अवस्था झाली आहे अगदी त्याच प्रमाणे ठेविदार हतबल झाले आहेत.सहकाराचा जिल्हा म्हणून आपली वेगळी अशी ओळख निर्माण असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील मल्टीस्टेटच्या घोटाळे बाजांना अनेक राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त लाभलेला असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे या मल्टीस्टेट च्या ठेविदारांना डोक्यावर हात मारून घेउन कोकलत बसण्याची वेळ आली आहे.नगर जिल्ह्यातील राजकीय पुढारी हे गोरगरीब ठेविदारांना वाचवण्या ऐवजी मल्टीस्टेटच्या घोटाळे बाजांना पाठीशी घालून संबंधित पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येवू नये म्हणून पोलिस स्टेशनमधील पोलिस निरीक्षकावर दबाव टाकीत आहेत.त्यामुळे नगर जिल्ह्यातील ठेवीदारांची “ना घरका ना घाटका,धोबीका कुत्ता”अशी अवस्था झाली आहे.निवडणुकीत मताचा जोगवा मागणारे लाचार पुढारीच या घोटाळे बाजांना पाठीशी घालून सर्व सामान्य ठेवीदारांची गळचेपी करीत आहेत. घोटाळे बाजांना कडक शासन करण्या ऐवजी उलट त्यांना पायघड्या टाकून अजूनही चराऊ कुरणे निर्माण करून देत आहेत. ठेविदारांच्या ठेवीची रक्कम परत मिळत नसल्याने अहिल्या नगर जिल्ह्यातील ठेवीदारांच्या वतीने फार मोठा लढा उभा करण्यात येत असून ठेविदारांच्या तक्रारी नोंदवून न घेणाऱ्या पोलीसांच्या विरोधात ११२/१०९० या टोल फ्री क्रमांकावर वरिष्ठांकडे तक्रारी दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.त्यामुळे अहिल्या नगर जिल्ह्यातील मल्टीस्टेटच्या घोटाळे बाजांचे आणि त्यांना मदत करणारांचे पितळ उघडे पडणार आहे. मुकी बिचारी कुणीही हाका या प्रमाणे ठेवीदारांची अवस्था झाली आहे.त्यांना कोणीही वाली राहीला नसल्याचे दिसून येत आहे.
























