Home महाराष्ट्र गरडवाडी येथे भव्य किर्तन महोत्सवात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन

गरडवाडी येथे भव्य किर्तन महोत्सवात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन

गरडवाडी येथे भव्य किर्तन महोत्सवात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन

 

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

सालाबाद प्रमाणे या वर्षीही किर्तन महोत्सव सोहळा २०२६ हा संपन्न होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील गरडवाडी येथे किर्तन महोत्सवा निमित्ताने दिनांक १४ ते २१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.वै.सदगुरू मारवाडी बाबा यांच्या कृपा आशिर्वादाने हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.या सप्ताहात दररोज पहाटे ४ते५ काकडा भजन, सकाळी ७ते८ विष्णू सहस्त्रनाम,८ते११ ज्ञानेश्वरी पारायण,११ते१२ गाथा भजन, आणि दुपारी १२ते१ सांप्रदायिक भजन,सायंकाळी ५ते६ हरीपाठ, रात्री ७ते९ हरीकिर्तन,व नंतर हरीजागर या प्रमाणे कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली आहे.या सप्ताहात गुरुवर्य स्वामी महंत १००८ त्रिवेदानंद महाराज सरस्वती, मिरजगाव क्षेत्राचे ह.भ.प. गणेश महाराज चेडे,पांगऱ्याच्या विठ्ठल गडाचे महंत ह.भ.प. रामकृष्ण महाराज आव्हाड, वडगाव शिंदोडीचे ह.भ.प. संभाजी महाराज पवार, आळंदीचे ह.भ.प. ऋषिकेश महाराज थोरात,आखेगाव येथिल जोग महाराज संस्थान चे महंत ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के,येळेश्वर संस्थानचे ह.भ.प. रामगीरी महाराज येळीकर यांची किर्तने होणार आहेत.दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान चे महंत ह.भ.प. देविदास महाराज म्हस्के यांचे काल्याचे किर्तन होउन पुण्यातील वडगाव शेरी येथील भाविक भक्त प्रमिला अशोक मंडलेचा यांच्या काल्याच्या महाप्रसादाच्या पंगतीने या सोहळ्याची सांगता होणार आहे.या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे “व्यासपीठ” ह.भ.प. सौ.कांचनताई बबनराव देशमुख या चालवणार आहेत.विष्णू चंद्रभान गरड, संजय गोल्हार, रविंद्र दहिफळे, अप्पासाहेब देशमुख,जनार्दन गरड,जनार्दन खेडकर, गहिनीनाथ केदार, बाबासाहेब गरड, सुखदेव गरड, मंगेश कनके, कै.नाथा गरड,कै.कोंडीराम गरड,कै.विश्वनाथ गरड,यांच्या स्मरणार्थ भानुदास गरड, शिवनाथ गरड, विष्णू गरड, कै. सारंगधर देशमुख यांच्या स्मरणार्थ जयकुमार देशमुख,महादेव गर्जे,किसन देशमुख, कै.भिमराज खेडकर यांच्या स्मरणार्थ गणेश खेडकर,कै. जिजाबा देशमुख यांच्या स्मरणार्थ मुरलीधर देशमुख, चंद्रसेन गरड, भगवान गरड, ज्ञानेश्वर दरंदले, सोपान गरड, गोरक्षनाथ गरड, अमोल गरड, मोहन गरड, रामदास सांगळे, विनोद चव्हाण, संदिप साठे,भरत देशमुख,भागचंद देशमुख यांच्या वतीने संपूर्ण सप्ताहात “अन्नदान” करण्यात येणार आहे. “काकडा भजन” विलास जावळे, बाळासाहेब देशमुख,नंदू देशमुख,निवृत्ती गरड, हे करणार आहेत.तर “मृदुंगाचार्य” म्हणून योगेश गरड,उद्धव वाघमारे,हर्षद गरड,योगऋषी देशमुख,हे काम पाहणार आहेत. “गायनाचार्य ” म्हणून कांता देवढे,अप्पा मोरे,जालींदर गरड,जनार्दन खेडकर,मोहन गरड,बाबासाहेब गरड,गंगाधर गरड,बबन देशमुख,एकनाथ वाघमारे,सुभाष गरड,सोमनाथ खेडकर,शिवाजी सांगळे,भरत देशमुख, गहीनिनाथ गरड,व समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ हे काम पाहणार आहेत.मंडप, लाईट,डेकोरेशन व्यवस्था गणेश गरड यांच्या वतीने करण्यात आली आहे.गावातील हनुमान मंदिरासमोर हा सोहळा टाळ मृदंगाच्या मोठ्या गजरात संपन्न होत आहे तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन गरडवाडी ग्रामस्थ आणि भजनी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Don`t copy text!