श्री.गो. से.हायस्कूल,पाचोरा येथे माझी वसुंधरा अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा संपन्न
पाचोरा (प्रतिनिधी ) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. गो.से. हायस्कूल, पाचोरा. येथे महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या माझीवसुंधरा अभियानांतर्गत पाचोरा नगरपरिषदेतर्फे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयात जनजागृती करण्याच्या उद्देशाने दिनांक 6 मार्च.2026. रोजी येथील कलादालन येथे ही स्पर्धा घेण्यात आली. इयत्ता पाचवी ते सातवी लहान गट. मोठा गट आठवी ते दहावी.विषय(1) माझी स्वच्छ आणि हरित पृथ्वी (2 )प्लास्टिक मुक्त शहर( 3) जलसंवर्धन काळाची गरज( 4) स्वच्छ पाचोरा सुंदर पाचोरा. या विषयांतर्गत कोणत्याही एका विषयात विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी देण्यात आली. यावेळी बक्षीस पात्र विद्यार्थी लहान गट प्रथम अकबर शहा सातवी क, द्वितीय वेदांत पाटील सातवी ब, तृतीय सचिन बडगुजर पाचवी इ,मोठा गट प्रथम धनश्री पाटील नववी क, द्वितीय वैष्णवी चव्हाण नववी फ, तृतीय भैरवी पाटील आठवी ड, अशी बक्षीस पात्र विद्यार्थी निवडण्यात आली . यावेळी मुख्याध्यापक एन. आर. पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत पर्यावरण विषयी माहिती दिली व्यासपीठावर पर्यवेक्षिका अंजली गोहिल, रहीम तडवी, क्रीडाशिक्षक संजय करंदे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना कलाशिक्षक सुनील भिवसने, सुबोध कांतायन, प्रमोद पाटील, ज्योती पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक प्रमोद पाटील यांनी केले.
























