जवखेडे खालसा येथील वै.सोपान महाराज ढाकणे यांच्या दींडीचे पैठण कडे प्रस्थान

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
वैकुंठवासी गुरूवर्य ह.भ.प. सोपान महाराज ढाकणे यांच्या दींडीचे पैठण कडे जवखेडे खालसा येथील समाधी स्थळापासुन प्रस्थान झाले. प्रारंभी अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील वृद्धेश्वर मंदिर,हनुमान मंदिर,भैरवनाथ मंदिर,विरभद्र मंदिरा पासून दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली होती.त्यावेळी गावचे सरपंच चारूदत वाघ यांनी दिंडीचे स्वागत केले.या दिंडीत संपूर्ण गावातील अबाल वृद्ध,महीला, भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.संपूर्ण गावाला घातलेल्या प्रदक्षिणे नंतर दोन्ही गावाच्या सिमेवर असलेल्या समाधी स्थळावर जाऊन देवा ब्राह्मणांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. आणि फटाक्यांच्या आतषबाजीत दिंडीचे जवखेडे -वाघोली सीमेवरून पैठण कडे प्रस्थान झाले.दिंडी रस्त्यावर येताच ह.भ.प. भाऊसाहेब रायभान दातीर, पांडुरंग दातीर, वसंत काळे,ह.भ.प. रमेश महाराज दातीर,मल्हारी मिसाळ,सोपान आव्हाड,यांनी दिंडीचे जोरदार स्वागत केले.संदिप वसंतराव आव्हाड यांच्या घरी प्रीती भोजन देण्यात आले.सायंकाळी रात्री आव्हाणे येथील निद्रिस्त अवस्थेत असलेल्या श्रीक्षेत्र गणपतीचे दर्शन घेऊन रात्री संभाजी पाटील कळमकर यांच्या निवासस्थानी ह.भ.प. बाबासाहेब महाराज मतकर यांचे किर्तन झाले.त्यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.तेथे कळमकर परीवाराच्या वतीने भोजन देण्यात आले.राजेंद्र ढाकणे,संजय शिरसाट सर, भानुदास शिंदे गुरुजी,वैभव आंधळे,अमोल वाघ,अनंत वाघ, विठ्ठलराव नागरगोजे, सुभाष कारखेले, संतोष दातीर, ज्ञानदेव ढाकणे, भानुदास महाराज शिरसाठ, राधाकिसन शिरसाठ,नवनाथ महाराज शिरसाठ,शंकर महाराज भागवत, अर्जुन पालवे, बाळासाहेब गडकर,उद्धव गडकर,चोपदार हिराजी मतकर, लक्ष्मण गर्जे, सोपान भोसले, संजय ढाकणे,विशाल आंधळे, सोपानराव जमधडे,पांडुरंग कळकुटे,अमोल मतकर,संतोष मतकर,सुभाष मतकर,रामहरी मतकर, भाऊसाहेब शेळके,दिलिप जमधडे,संदिप मतकर, आदिनाथ मतकर,संभाजी दातीर,बलभीम जमधडे,वृद्धेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी हे या दिंडी सोबत उपस्थित आहेत. या दिंडीस बबनराव भुसारी, आणि अंबादास कळमकर यांनी सदिच्छा भेट दिली.
























