आमखेडा येथील लायबा बेगचा पहिला रोजा पूर्ण
सोयगाव / दत्तात्रय काटोले
सोयगाव तालुक्यातील आमखेडा येथील लायबा बेग (वय ८) हिने आपल्य आयुष्यातील पहिला रमजानचा रोजा यशस्वीपणे पूर्ण केला. एवढ्या लहान वयात तिने श्रद्धा, संयम आणि आत्मविश्वासाने रोजा पाळल्यामुळे परिसरात तिचे कौतुक होत आहे.
लायबा ही लाल बेग यांची कन्या असून तिच्या या यशाबद्दल आई-वडील, दादी, नानी, दोन बहिणी, मोठेबाबा, मोठी आई तसेच संपूर्ण बेग परिवारात आनंदाचे वातावरण आहे. नातेवाईक, मित्रमंडळी आणि गावकऱ्यांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. लायबाने सांगितले की, तिने हा रोजा पूर्ण करण्यासाठी मोठ्यांकडून प्रेरणा घेतली.
कोट.
रमजान हा इस्लाम धर्मातील पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात मुस्लिम बांधव रोजा ठेवून संयम, त्याग आणि आत्मशुद्धीचा संदेश देतात. दिवसभर उपवास करून अल्लाहची प्रार्थना केली जाते. रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर साजरी होणारी रमजान ईद ही बंधुभाव, एकता आणि आनंदाचा सण आहे. या दिवशी मुस्लिम समाज नमाज अदा करून एकमेकांना शुभेच्छा देतो व गरजूंना मदत करण्याचा संदेश दिला जातो.
असे कृषिभूषण अरुण सोहनी यांनी सांगितले.
फोटो. दत्तात्रय काटोले
























