कुरुक्षेत्र करिअर अकॅडमी चा NMMS परीक्षेत घवघवीत यश
दत्तात्रय काटोले, सोयगाव
सोयगाव येथील कुरुक्षेत्र करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील National Means-cum-Merit Scholarship Scheme (NMMS) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्याचा शैक्षणिक मान उंचावला आहे. प्रथमच तब्बल ११ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ही प्रतिष्ठेची परीक्षा उत्तीर्ण करून अकॅडमीच्या गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनाची साक्ष दिली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये वैष्णवी कडुबा ढगे, देवयानी गोपाल औटे, नेहा शिवदास आस्वार, अक्षरा परशुराम पंडित, पलक भागवत गायकवाड, देवयानी निलेश मिसाळ, तेजस समाधान भोकरे, गायत्री भगवान बावस्कर, प्रांजली राजेंद्र खलसे, वृषाली गोपाल साळुंखे व पार्थ समाधान इंगळे यांचा समावेश आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार, संकल्पनाधारित व नियोजनबद्ध मार्गदर्शन देणारी ही तालुक्यातील एकमेव स्पर्धा परीक्षा अकॅडमी ठरली आहे. सातत्यपूर्ण सराव, वैयक्तिक लक्ष व शिस्तबद्ध अभ्यासपद्धतीमुळे विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे.
NMMS परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाकडून इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंत दरमहा ₹१००० प्रमाणे एकूण ₹४८,००० पर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. त्यामुळे ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी भक्कम आर्थिक आधार मिळतो.
अकॅडमीचे प्रमुख मार्गदर्शक सचिन सर यांनी सांगितले की, “NMMS सारख्या शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देतात व भविष्यातील मोठ्या स्पर्धा परीक्षांचा मजबूत पाया घालतात. योग्य दिशादर्शन, मेहनत आणि पालकांचे सहकार्य मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठी स्वप्ने पूर्ण करू शकतात.”
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पालक, शिक्षक व नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, या यशामुळे सोयगाव तालुक्यात शैक्षणिक चळवळीला नवी प्रेरणा मिळाली आहे.
“शिक्षण हेच यशाची गुरुकिल्ली आहे; योग्य मार्गदर्शन आणि जिद्द असेल तर ग्रामीण विद्यार्थीदेखील राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवू शकतात,” असा सकारात्मक संदेश या यशातून अधोरेखित झाला आहे.

























