Home महाराष्ट्र हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या जवखेडे खालसा येथील कान्होबा देवाची यात्रा पोलिस निरीक्षक...

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या जवखेडे खालसा येथील कान्होबा देवाची यात्रा पोलिस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांच्या कडक बंदोबस्तामुळे शांततेत संपन्न, हगाम्यातील शेवटची (२५,०००) रुपयांची इनामी कुस्ती बरोबरीत

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["default"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या जवखेडे खालसा येथील कान्होबा देवाची यात्रा पोलिस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांच्या कडक बंदोबस्तामुळे शांततेत संपन्न, हगाम्यातील शेवटची (२५,०००) रुपयांची इनामी कुस्ती बरोबरीत

 

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

संपूर्ण महाराष्ट्रात भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र मढी येथिल कानिफनाथ देवस्थान नंतर दुसरा नंबर हा पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील कान्होबा देवस्थानचा लागतो.या देवाची यात्रा पाडव्याच्या दिवशी सुरू होते.गावातील सर्व जाती धर्माच्या लोक पैठण येथे जातात.तेथुन कावड खांद्यावर घेऊन अनवाणी पायाने पायी चालत येतात.थेट पाडव्याच्या दिवशी पहाटे तिसगाव-मीरी रस्त्यावर असलेल्या कान्होबा देवाला पाणी घालून आपला कावडीचा मानाचा नवस पुर्ण करतात.या वर्षीही भाविकांनी वाजत गाजत मध्यरात्री पासून भल्या पहाटे पर्यंत पैठणहुन आणलेल्या गंगेच्या पाण्याने कान्होबा देवाला अंघोळ घातली. पाडव्याच्या दिवशी रात्री संदल मिरवणूक काढण्यात आली होती.दुसऱ्या दिवशी सायंकाळी साडे सात वाजता दोन्ही समाजांच्या वतीने स्वतंत्र दोन छबिना मिरवणूका काढण्यात आल्या होत्या.या मिरवणूकीत खरोखरच प्रत्यक्ष हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडले.हिंदूनी भगवा ध्वज आणि देवाचा पांढऱ्या तांबड्या रंगाचा घोडा सजवून वाद्यांचा दणदणाटात स्वतंत्र मिरवणूक काढली होती तर मुस्लिम समाजाने पारंपरिक पद्धतीने गाडीवरून फुलांनी सजवलेल्या चादरीची आणि हातात मशाल घेऊन घोडा मिरवणूक काढली होती.आणि फटाक्यांच्या आतषबाजीने आणि सलामी तोफांच्या प्रचंड आवाजाने जवखेडे खालसा गाव दणाणून गेले होते.पाथर्डीचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी मागवलेला राज्य राखिव दलाचा पोलिस फोर्स आणि पाथर्डी पोलिसांच्या मोठ्या फौज फाट्याच्या कडक बंदोबस्तामुळे या मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार न घडता ही मिरवणूक यात्रा शांततेत पार पडली.तिसऱ्या दिवशी सकाळी कलाकारांचा हजेरी कार्यक्रम संपन्न झाला.सायंकाळी महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या कुस्त्यांचा जंगी हंगामा भरवण्यात आला होता.या हगाम्यात राज्यातील एकूण नामवंत मल्लांच्या २८ कुस्त्या अगोदरच मोठ्या फलकाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या होत्या.त्या मध्ये ११०० रूपया पासून तर थेट २५००० हजार रूपया पर्यंतच्या कुस्त्यांचा उल्लेख करण्यात आला होता.आणि ग्रामस्थां तर्फे ही वैयक्तिक स्वतंत्र बक्षिसे जाहीर करून वेगवेगळ्या कुस्त्या लावण्यात आल्या होत्या.गावातील अहिल्यादेवी होळकर मुख्य चौकापासून तर थेट गावठाणा तील कुस्तीच्या मैदाना पर्यंत कुस्त्यांच्या मुख्य पंचांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती.गावातील जेष्ठ नेते शहाबुद्दीन भाई शेख आणि वयोवृद्ध कृषी अधिकारी शिवाजीराव वाघ साहेब यांच्या हस्ते नारळ फोडून या जंगी हगाम्याची सुरूवात करण्यात आली.त्यांनी वैयक्तिक पराजीत झालेल्या पैलवानांना प्रवास भाडे म्हणून वीस, पन्नास ते शंभर रुपये ईनाम म्हणून दिले.या हगाम्यात पंच म्हणून सुरेश वाघ,ताजुद्दीन शेख,कैलास मतकर,इसाक शेख,अनंत वाघ, ॲडव्होकेट निसारभाई शेख,शरद गवळी, भैय्या दूकानदार, ॲडव्होकेट वैभवराव आंधळे,मुस्ताकभाई शेख,राजू आंधळे, नजमोद्दीन शेख, पंढरीनाथ आंधळे, ॲडव्होकेट असिफभाई शेख, संकेत वाघ,नुरमहंमद शेख,भाऊसाहेब शेळके,राजमहंमद शेख,सरपंच चारुदत्त वाघ पाटील, ॲडव्होकेट इलियास शेख,देवदान बर्फे यांनी काम पाहिले.रोख स्वरूपातील इनामी बक्षिसांचे वाटप जेष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट लतिफभाई इस्माईल शेख आणि माजी सरपंच इरफान पठाण यांनी केले. शेवटची पंचवीस हजाराची ईनामी कुस्ती कामत शिंगवे येथिल पैलवान अनिल लोणारे आणि जवखेडे खालसा येथील इम्रान शेख यांच्यात झाली.अतिशय अटीतटीच्या लढतीमुळे शेवटी पंचांकडून ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.कुस्ती न खेळताच पंचाकडू पैसे लुबाडण्याचा एक नवा ट्रेंड माजी पैलवानांनी संपूर्ण राज्यभर सुरू केला आहे. राज्यातील सर्व कुस्ती पंचांनी या कडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.असाच एक प्रकार जवखेडे खालसा येथील हंगाम्यात पहावयास मिळाला. राघोहिवरे येथील स्वतःला माजी चेअरमन म्हणून घेणारा एकटांगी धोतरावाला घोरपडे नावाचा माजी पैलवान कुस्ती न खेळताच वेगवेगळ्या दोन पंचांकडून पाचशे पाचशे रूपयांच्या दोन चिठ्ठ्या घेऊन पैसे उकळू पहात होता.त्याचा बोगस पैसे लुबाडण्याचा प्रयत्न पंचांच्या लक्षात येताच त्यांनी तो हाणून पाडला.अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा यात्रा महोत्सव शांततेत संपन्न झाला.या यात्रेत सर्व जाती धर्माच्या लोकांना व्यवसायीक दुकाने लावण्या साठी परवानगी देण्यात आली होती.आणि हगाम्यात ही सर्व जाती धर्मातील नामवंत पैलवानांच्या कुस्त्या लावण्यात आल्या होत्या.त्यामुळे राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत तरतूद केलेल्या स्वातंत्र्य समता आणि बंधुता या नितीमुल्यांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून ही यात्रा संपुर्ण राज्यभर एक नवा आदर्शवत आयाम निर्माण करून प्रसिद्ध होऊ पहात आहे. संपूर्ण देशभरात जातीयतेचे विष पेरणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून या नव्या जमाण्यात जवखेडे खालसा या गावाने हा एक नवा आदर्श निर्माण केला आहे.राहुरी येथील पत्रकार गणेश हापसे यांनी हा उपक्रम आपल्या गणराज्य न्युज या यूट्यूब चॅनल वरून लाईव्ह प्रक्षेपित केला होता.

Don`t copy text!