Home पाचोरा गो.से.हायस्कूल,पाचोरा आयोजित कलारंग 2025- 26 या सांस्कृतिक कार्यक्रमात इयत्ता-6 वी (ड) च्या...

गो.से.हायस्कूल,पाचोरा आयोजित कलारंग 2025- 26 या सांस्कृतिक कार्यक्रमात इयत्ता-6 वी (ड) च्या विद्यार्थ्यांनी “दमलेल्या बाबांची कहाणी” या नृत्यात सहभाग

गो.से.हायस्कूल,पाचोरा आयोजित कलारंग 2025- 26 या सांस्कृतिक कार्यक्रमात इयत्ता-6 वी (ड) च्या विद्यार्थ्यांनी “दमलेल्या बाबांची कहाणी” या नृत्यात सहभाग

 

 

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. गो.से.हायस्कूल,पाचोरा आयोजित कलारंग 2025- 26 या सांस्कृतिक कार्यक्रमात इयत्ता-6 वी (ड) च्या विद्यार्थ्यांनी “दमलेल्या बाबांची कहाणी” या नृत्यात सहभाग नोंदवलेला होता. नृत्याचे सादरीकरण इतके अप्रतिम झाले की, बघणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. नृत्य सर्वाना इतके भावले कि पालक वर्ग आणि शिक्षक बंधू भगिनी यांच्या प्रतिक्रिया बक्षीस रूपात विद्यार्थ्यांना मिळाल्या. त्याच बक्षीस रुपये रकमेतून वर्गशिक्षक श्री.रवींद्र जाधव सर यांनी विद्यार्थ्यांच्या या आठवणी कायमस्वरूपी मनात राहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला शिल्ड मिळावी ही इच्छा प्रगट केली. माननीय मुख्याध्यापक श्री एन. आर.पाटील सर यांनी सरांची इच्छा पूर्ण करण्याचा शब्द दिला. नृत्यातील एकूण 50 विद्यार्थ्यांना शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले. शिल्ड मिळाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता.

आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री एन. आर.पाटील सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शिल्ड देण्यात आले. याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षिका सौ ए.आर. गोहिल मॅडम पर्यवेक्षक श्री आर.बी तडवी सर, ज्येष्ठ शिक्षक श्री पी एम पाटील सर, कलाशिक्षक श्री सुबोध कांतायन सर, श्री सागर थोरात सर,श्री सागर पाटील सर व 6 वी ‘ड’ चे विद्यार्थीप्रिय वर्गशिक्षक श्री रवींद्र जाधव सर उपस्थित होते.

मुख्याध्यापक श्री. एन. आर.पाटील सर यांनी विद्यार्थ्यांचे व श्री. रवींद्र जाधव सर यांचे मनापासून कौतुक केले. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.

Don`t copy text!