पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या शिरपेचात आणखी एक ‘मानाचा तुरा’
विकसित भारत @ 2047 या दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेत प्रा. सौ. जयश्रीताई वर्मा-वाघ यांना बेस्ट रीसर्च प्रेसेंटेशन आवर्ड
पाचोरा दि. 19 – लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागामार्फत ‘विकसित भारत @ 2047’ या विषयावर दि. 13 व 14 फेब्रुवारी 2026 रोजी प्रवरानगर, ता. राहता जि. अहिल्यानगर येथील APJ Abdul Kalam Seminar हॉलमध्ये दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या राष्ट्रीय परिषदेसाठी महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, कर्नाटक आदी राज्यांतून एकूण 170 शोधनिबंध प्राप्त झाले होते. त्यापैकी सुमारे 40 संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांनी आपले शोधनिबंध प्रत्यक्ष सादर केले.
या परिषदेत पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या *प्रा. सौ. जयश्रीताई वर्मा-वाघ* यांनी आपला शोधनिबंध प्रभावीपणे सादर करत ‘बेस्ट रिसर्च पेपर प्रेझेंटेशन’ या राष्ट्रीय स्तरावरील प्रथम क्रमांकाचा मान पटकावला. यावेळी त्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.
या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार मा. श्री. भाऊसाहेब दिलीप ओंकार वाघ, चेअरमन मा. श्री. नानासाहेब संजय ओंकार वाघ, व्हा. चेअरमन मा. श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी, ज्येष्ठ संचालक मा. श्री. दादासाहेब खलील देशमुख, ज्येष्ठ संचालक मा. श्री. आप्पासाहेब सतीश चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रा. डॉ. शिरीष बी. पाटील, उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. वासुदेव एस. वले, उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील व ज्येष्ठ पत्रकार मा. प्रा. सी. एन. चौधरी यांनी सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
याप्रसंगी डॉ. के. एस. इंगळे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. एस. बी. तडवी, वाणिज्य व व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. वाय. बी. पुरी, डॉ. क्रांती व्ही. सोनवणे, IQAC समन्वयक डॉ. शरद बी. पाटील, प्रा. स्वप्नील वाय. भोसले, डॉ. अतुल एस. सूर्यवंशी, डॉ. सुनीता बी. गुंजाळ, प्रा. कविता महाजन ,प्रा. लक्ष्मी गलानी, प्रा. जयश्री महाजन, डॉ. सपना रावते, प्रा. सुनीता तडवी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या यशाने आज एस एस एम एम महाविद्यालय ,पाचोरा च नव्हे तर पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे संपूर्ण भारतात नाव लौकिक झाले आहे. पाचोरा तालुक्यातील विविध स्तरांवरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सोबतच या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेला आणि संशोधन परंपरेला नवे बळ मिळेल.























