पाचोरा येथील सु .भा.पाटील .विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी दिली श्री. गो. से . विद्यालयास भेट , तसेच विविध स्पर्धांचे आयोजन

पाचोरा येथील सु .भा.पाटील .विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी दिली श्री. गो. से . विद्यालयास भेट , तसेच विविध स्पर्धांचे आयोजन

पाचोरा( प्रतिनिधी) पि.टी.सी .संचालित सु. भा. पाटील. विद्या मंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांनी श्री गो से हायस्कूल पाचोरा या शाळेला भेट दिली. यावेळी पहिली ते चौथी या वर्गातील विद्यार्थ्यांना रवींद्र बोरसे सरांनी शाळेविषयी मार्गदर्शन केले शाळेतील विविध उपक्रम याबाबत माहिती दिली व विद्यार्थ्यांचे स्वागत मुख्याध्यापक सुधीर सुधीर पाटील ,उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक एन आर पाटील, रणजीत पाटील, संजय करं दे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. प्रत्येक वर्गानुसार इमारत ,विद्यार्थ्यांना शाळेतील प्रशस्त वाचनालय याबाबत माहिती पी .एम. पाटील. व धनगर भाऊसाहेब यांनी विद्यार्थ्यांना शाळेतील विद्यार्थ्यांना दिली विविध पुस्तकांचे वाचन दर आठवड्याला एकदा विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. त्याचप्रमाणे प्रयोगशाळा येथील विविध प्रयोग तेथील संग्रहित वास्तु , यांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. यावेळी छाया सूर्यवंशी, अंजली गोहील, प्रयोगशाळा परिचय महाजन यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली, संगीत दालनात विद्यार्थ्यांना संगीत शिक्षक सागर थोरात, रुपेश पाटील, यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे गीत गायन याबाबत ऐकून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले यावेळी विद्यार्थी भारावलेले दिसले तबला वादक हार्मोनियम पाहून विद्यार्थ्यांना कुतुहूल दिसला, यानंतर प्रशस्त संगणक वर्ग त्या ठिकाणी शिकवले जाणार ज्ञान व प्रत्यक्ष संगणक हाताळणी पाहून विद्यार्थी त्यांना अरुण कुमावत,वाघ सर, यांनी मार्गदर्शन केले , शाळेतील मुख्य शाळेतील बोलक्या भिंती विविध नकाशे महापुरुषांचे विचार, शाळेतील बोलक्या भिंती हे पाहून विद्यार्थी कुतुहलाने पाहत होती. कलादालन विद्यार्थ्यांची स्वागत करून विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी काढलेले सुंदर चित्रांचे प्रदर्शन त्यामध्ये फुलदाणी. कार्टून डिझाईन, सकाळचा देखावा असे चित्र दाखवण्यात आले व त्याबाबत माहिती देण्यात आली विविध प्रकारचे चित्र पाहून विद्यार्थी कुतुहलाने पाहत होती यांना मार्गदर्शन सुबोध कांतयन, प्रमोद पाटील, ज्योती पाटील यांनी सविस्तर मार्गदर्शन केले यानंतर कलादालन येथे रंगभरण स्पर्धा सुंदर हस्ताक्षर स्पर्धा राबवण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांना रंग भरण्यासाठी चित्रकला रंगभरण स्पर्धेसाठी कागद देऊन हेलिकॉप्टर की जो शाळेचा सिम्बॉल लोगो एस. जी. एस. (गो से. हायस्कूल)असलेला रंग भरण्यासाठी देण्यात आला .विद्यार्थी आनंदाने रंग भरू लागले व मंत्रमुग्ध झाले. यानंतर सुंदर हस्ताक्षर स्पर्धेसाठी वैशाली कुमावत, गायत्री पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .यानंतर विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला .त्यानंतर बक्षीस वितरण प्रसंगी शिक्षण विभागातर्फे सरोज गायकवाड मॅडम मुख्याध्यापक सुधीर पाटील,सु.भा .पाटील. चे मुख्याध्यापक अशोक परदेसी, दीपक पाटील. उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ पर्यवेक्षक आर एल पाटील एन .आर .पाटील, ए .बी अहिरे. सांस्कृतिक प्रमुख रहीम तडवी. यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली सुरुवातीला ईशस्तवन अंजली गोहील, श्रद्धा गायकवाड, ज्योती ठाकरे, यांनी केले त्यांना संगीत साथ सागर थोरात, रुपेश पाटील. यांनी दिली. प्रास्ताविकामध्ये शाळेतील उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ यांनी शाळेविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आमच्या शाळेत विविध स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम घेतली जातात हे सांगितले. त्यानंतर सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला .प्रथम द्वितीय तृतीय अशी विभागून बक्षिसे खालील विद्यार्थ्यांना देण्यात आली. भावना महाले, खुशी वाघ तर रंगभरण स्पर्धेसाठी भैरवी पाटील, वैष्णवी मराठे, काव्या पाटील, गीत गायन साठी निशा पाटील, ललिता गोपाळ, अंकिता माडी, वकृत्व साठी राज तावडे, खुशी महाजन, तेजस्विनी पवार, 100 मीटर धावणे स्पर्धेत विराट संदांशिव, शेख नविब, समीर गोहील या विद्यार्थ्यांना ट्रॉफी प्रमाणपत्र गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सु.भा. पाटील. विद्यालयातील शिक्षक शिक्षिका उज्वला साळुंखे ,वर्षा पाटील, रवींद्र महाले, संदीप वाघ, अभिजीत मालपुरे, राकेश पाटील, रूपाली निकम, मनोज पवार, इत्यादी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांमध्ये मनोगतामध्ये सिद्धी मेटकर, विराज संदांशिव, ललिता पाटील, खुशी महाजन यांनी शाळेविषयी भेट प्रसंगी आनंद व्यक्त केला अशा स्पर्धा पाहून व शाळा पाहून आम्ही भरला असून शाळा आम्हाला शाळा आवडले असल्याचे मनोगत व्यक्त केले. व पुढील वर्षी आम्ही या शाळेत येऊ असे सांगितले.सावित्रीबाई फुले ,मा जिजाऊ यांचे गायन करून विद्यार्थ्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले अध्यक्षीय भाषणात पर्यवेक्षक ए .बी .अहिरे. यांनी आमच्या शाळेत ज्ञानाची शिदोरी दिली जाते पाचोरा शहरातील आमच्या शाळेत डॉक्टर, इंजिनियर, वकील, तज्ञ या शाळेने दिले असून या शाळेचा फार मोठा इतिहास आहे .त्यामुळे या शाळेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता असते विद्यार्थ्यांचे कलागुण निर्माण केले जातात. सूत्रसंचालन अरुण कुमावत, रवींद्र बोरसे यांनी तर आभार प्रदर्शन सुबोध कांतयान यांनी मानले .कार्यक्रमाची सांगता झाली यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे मार्गदर्शन लाभले.