Home महाराष्ट्र आदर्श शाळेतील आदर्श शिक्षकाचा आदर्श विवाह

आदर्श शाळेतील आदर्श शिक्षकाचा आदर्श विवाह

आदर्श शाळेतील आदर्श शिक्षकाचा आदर्श विवाह

 

 

 

 

सोयगाव | प्रतिनिधी दत्तात्रय काटोले

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सोयगाव येथील आदर्श शिक्षक तसेच तिडका येथील माजी पोलीस पाटील रामचंद्र महाकाळ यांचे सुपुत्र व पेडगाव (ता. सिल्लोड) येथील साईनाथ अंभोरे यांची कन्या शुभांगी यांचा दि. ११ जानेवारी २०२६ रोजी पेडगाव येथे अत्यंत साध्या व आदर्श पद्धतीने विवाह संपन्न झाला.

सकाळी साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर समाजातील ज्येष्ठ मंडळींनी दोन्ही कुटुंबीयांकडे विवाहाचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव वर-वधू तसेच वराचे वडील दिगंबर महाकाळ व वधूचे वडील साईनाथ अंभोरे यांनी मान्य केल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी साधेपणाने विवाह सोहळा पार पडला.

आजच्या झगमगाटी, खर्चिक विवाहसंस्कृतीच्या काळात सरकारी सेवेत कार्यरत असतानाही अत्यंत साध्या, खर्चिक टाळणाऱ्या व समाजाला दिशा देणाऱ्या पद्धतीने विवाह केल्याबद्दल तिडका येथील महाकाळ परिवार व पेडगाव येथील अंभोरे परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा विवाह समाजासाठी निश्चितच अनुकरणीय आदर्श ठरत आहे.

या आदर्श विवाहासाठी जिल्हा परिषद केंद्रीय शाळा, सोयगाव येथील मुख्याध्यापक श्री. किरणकुमार पाटील, स्वामी दयानंद माध्यमिक विद्यालय, तिडका येथील मुख्याध्यापक श्री. सुनील सरदार राजपूत, श्री. किसनदादा खंबाट, वधूचे वडील साईनाथ अंभोरे, काका भागवत अंभोरे, मामा दत्तू गवांडे (वाकी), वराचे वडील दिगंबर महाकाळ, गवळी सर, दिगंबर जाधव, दिलीप क्षीरसागर, पुंडलिक कदम आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.

खऱ्या अर्थाने हा विवाह “आदर्श शाळेतील आदर्श शिक्षकाचा आदर्श विवाह” ठरला असून समाजातील सर्व घटकांनी यापासून प्रेरणा घ्यावी, अशी भावना उपस्थितांतून व्यक्त करण्यात आली.

फोटो दत्तात्रय काटोले.

Don`t copy text!