Home महाराष्ट्र सोयगाव : छत्रपती शिवाजी क्रिडा मंडळ व क्रिडा भारतीच्या कबड्डी स्पर्धेत जय...

सोयगाव : छत्रपती शिवाजी क्रिडा मंडळ व क्रिडा भारतीच्या कबड्डी स्पर्धेत जय बजरंग कापूसवाडी संघाने प्रथम ,बी बॉईस सोयगाव संघाने द्वितीय

सोयगाव : छत्रपती शिवाजी क्रिडा मंडळ व क्रिडा भारतीच्या कबड्डी स्पर्धेत जय बजरंग कापूसवाडी संघाने प्रथम ,बी बॉईस सोयगाव संघाने द्वितीय

 

 

 

तर रायसेन संघ वरखेडी तांडा संघाने मिळविला तृतीय क्रमांक. तसेच छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ सोयगाव चतुर्थ बक्षिसांचा ठरला मानकरी,

स्पर्धेत पुणे,मुंबई व जळगाव १६ संघाचा सहभाग.

सोयगाव प्रतिनिधी/दत्तात्रय काटोले

सोयगाव

येथील प्रदीप चित्र मंदिर मैदानावर छत्रपती शिवाजी क्रिडा मंडळ व क्रिडा भारती यांच्या संयुक्त विद्यमानाने ६० किलो आतील वजनी गट कबड्डी स्पर्धाचा शनिवारी सायंकाळी डॉ.विलास हरपाळे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून शानदार शुभारंभ करण्यात आला होता.स्पर्धा शनिवार व रविवारी रात्रंदिवस प्रकाश झोत्तात घेतल्या गेल्या.या स्पर्धेत पुणे,नाशिक, कल्याण,आहिल्यानगर, बुलढाणा व पाचोरा सह एकूण १६ संघांनी सहभाग नोंदविला होता.

प्रथमच मॅट वर घेण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेत जय बजरंग कापूसवाडी संघाने प्रथम ,बी बॉईस सोयगाव संघाने द्वितीय तर रायसेन संघ वरखेडी तांडा संघाने तृतीय क्रमांक मिळविला.तसेच छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ सोयगाव चतुर्थ बक्षिसांचा ठरला मानकरी ठरला.

स्पर्धेत पुणे,मुंबई, जालना,नाशिक,बुलढाणा व जळगाव १६ संघाचा सहभागी झाले होते.

विजेत्या संघांना संस्थापक अध्यक्ष डॉ.विलास हरपाळे, प्रशिक्षक आबा पवार,रतन फुसे,भरत पगारे, भगवान रोकडे,हर्षल काळे,गोविंदा सोनवणे योगेश पिंटो वाघ,विवेक महाजन,अक्षय ओरंगे,उदय रावळकर यांचे हस्ते वितरित करण्यात आले.

स्पर्धेसाठी पंच म्हणून डिगंबर राठोड,संदीप भोसले यांनी.उत्कृष्ठ काम पाहिले. तसेच भूषण पवार,दीपक बनकर,संदीप चौधरी, कृष्णा जूनघरे, दिलीप पायघन, अविनाश पाटील, आनंदा इंगळे, दत्तु पोटदुखे, नाना वामने, दत्तु देशमुख, भगवान रोकडे, संदिप चौधरी, श्रीकांत बोरसे, विजय पगारे, मंगेश सोहनी, दत्तात्रय काटोले,अविराज रोकडे, योगेश हजारी, कमलेश काळे ,उदय रावळकर, अक्षय औरंगे, अली शेख, ऋतीक चौधरी, निखील चौधरी, अनिल रोकडे, सोहेल शिकलगर,अविनाश श्रीखंडे, भूषण पवार ,दीपक बनकर,गुड्डू शेख, मुदशीर शेख, भावेश खैरनार, पीयुष काटोले,अमर शहा,समीर शहा, जुलकर शहा, सोहम , साई,यश, अनु,अर्णव, अंशू,संकेत,हर्षल ,प्रथमेश,बंटी ,सलमान,अल्ताफ

यांनी विशेष परिश्रम घेत घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय पाटील यांनी तर आभार आबा पवार यांनी मानले.

फोटो ओळ:- सोयगाव – येथे छत्रपती शिवाजी क्रिडा मंडळ सोयगाव तर्फे येथे कबड्डी स्पर्धेत प्रथम बक्षिसाचा मानकरी ठरलेल्या जय बजरंग कापूसवाडी संघास पारितोषिक देताना संस्थापक अध्यक्ष डॉ.विलास हरपाळे, प्रशिक्षक आबा पवार,भरत पगारे,गोविंदा सोनवणे, भगवान रोकडे व मान्यवर

फोटो. दत्तात्रय काटोले

Don`t copy text!