वृद्धेश्ववर साखर कारखाना आणि कोपरे येथे अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
संत भगवानबाबा यांच्या कृपेने व वै.रामभाउ शिरसाट यांच्या कृपा आशिर्वादाने आणि वैकुंठवासी ह.भ.प. संत वामनभाउ पुण्यतिथीच्या निमित्ताने वृद्धेश्वर साखर कारखाना येथिल शिरसाट वस्तीवर अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ह.भ.प.मच्छिंद्र महाराज चितळे आणि ह.भ.प.केशव महाराज गुजर आव्हानेकर यांच्या हस्ते विणा उभारण्यात येणार आहे.शनिवार दिनांक १० जानेवारी रोजी रात्री ८ ते १० हनुमान टाकळी येथील ह.भ.प. वैष्णवीदिदी बर्डे यांचे किर्तन होणार आहे.त्यानंतर संगीत भारुडाचा कार्यक्रम होणार आहे.रविवार दिनांक ११ जानेवारी रोजी सकाळी ९ ते११ ह.भ.प.वैष्णवी दिदी महाराज बनसोड,पैठणकर यांचे किर्तन होउन महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होणार आहे.तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन बाबासाहेब रामभाऊ शिरसाट,जनार्दन शिरसाट, आदिनाथ शिरसाट,सुखदेव शिरसाट,अशोक शिरसाट, सोमनाथ शिरसाट गणेश शिरसाट आणि शिरसाट परीवाराच्या वतीने करण्यात आले आहे.या सोहळ्यासाठी शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे या आवर्जून उपस्थित राहणार आहेत.कोपरे येथे ही दिनांक ११ जानेवारी रोजी सायंकाळी ह.भ.प.घुले सर यांचे संत भगवानबाबा आणि संत वामनभाउ मंदिरात प्रवचन होणार आहे.तरी परीसरातील भाविकांनी या सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन गंगा भागीरथी श्रीमती सिताबाई धोंडीबा आव्हाड यांनी केले आहे.

























