आमदार किशोर दराडे यांचे कडून पाचोरा कन्या विद्यालयात प्रोजेक्टर भेट

आमदार किशोर दराडे यांचे कडून पाचोरा कन्या विद्यालयात प्रोजेक्टर भेट

 

 

( पाचोरा प्रतिनिधी )

शिक्षक आमदार माननीय किशोर दराडे यांचे कडून पाचोरा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय शैक्षणिक प्रोजेक्टर भेट देण्यात आला. आज दिनांक 2 जानेवारी रोजी आमदार किशोर दराडे यांचे स्वीय सहाय्यक हरीश मुंडे, जिल्ह्याचे ज्येष्ठ सहकार नेते आप्पासाहेब संभाजीराव पाटील, पाचोरा तालुका संपर्क प्रमुख संतोष पैठणकर यांनी कन्या विद्यालयाला भेट दिली.

 

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी कन्या विद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे यांना शैक्षणिक प्रोजेक्टर भेट दिला. विद्यालयातर्फे उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. आप्पासाहेब संभाजी पाटील यांनी नूतन प्राचार्य डॉ शिवाजी शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. व ओघवत्या शैलीत शिक्षक सभेला मार्गदर्शनही केले. प्रा. रवींद्र चव्हाण यांनी आभार मानले. आमदार किशोरजी दराडे यांनी भेट दिलेल्या प्रोजेक्टर मुळे शाळेतील अध्ययन अध्यापन प्रक्रिया अत्यंत सुलभ व प्रभावी होण्यास मदत होईल असे मत विद्यालयातर्फे प्राचार्य डॉ. शिवाजी.शिंदे यांनी व्यक्त केले.