सोयगाव येथे मानवतेचे कल्याण हो यासाठी अहो रात झटणारे संत गाडगेबाबांची ६९ वी पुण्यतिथी साजरी
दत्तात्रय काटोले
सोयगाव, दि. २० डिसेंबर :
सोयगाव शहरातील संत गाडगेबाबा चौक येथे राष्ट्रसंत व स्वच्छतेचे पुजारी संत गाडगेबाबा यांची ६९ वी पुण्यतिथी श्रद्धा व आदरभावनेने साजरी करण्यात आली. यावेळी संपत मंडवे यांच्या हस्ते संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले.
कार्यक्रमास रामराव रोकडे, आन्ना जाधव, कृष्णा शेवाळकर, दत्तू रोकडे, संतोष महाले, सुनील रोकडे, बबन रोकडे, योगेश रोकडे, अनिल निकुंम, गोकुळ रोकडे, बापू महाले, प्रा. अनिल मानकर, नगरसेवक हर्षल काळे, कदीर शहा, राजेंद्र दुतोंडे, संदीप चौधरी, सुरेश घन यांच्यासह पत्रकार, व्यापारी वर्ग व विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी संत गाडगेबाबांच्या आदर्श कर्म व कार्याचा उल्लेख केला. संत गाडगेबाबांनी आयुष्यभर स्वच्छता, शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन व सामाजिक समतेसाठी कार्य केले. गावोगावी जाऊन स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे, स्वतः झाडू हातात घेऊन परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश देणे, दारू व व्यसनमुक्तीचा प्रचार करणे, तसेच शिक्षणासाठी शाळा, धर्मशाळा व वसतिगृहे उभारण्याचे कार्य त्यांनी केले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा व सामाजिक विषमता दूर करण्यासाठी त्यांनी कीर्तन व प्रवचनांच्या माध्यमातून जनजागृती केली.
त्यांचे विचार आजही समाजासाठी मार्गदर्शक असून युवकांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पडला.
























