बीड येथील राज्य खो खो स्पर्धेसाठी जळगांव जिल्ह्याच्या पुरुष/महिला खो खो संघाच्या कर्णधारपदी मोहित गुंजकर व किरण बोदडे यांची निवड….!!!!
जळगाव (क्रीडा प्रतिनिधी) –महाराष्ट्र खो खो असोसिएशनने सन 2025-26 ची पुरुष/महिला या विभागाची 61 वी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा बीड येथे संपन्न होत आहे. यात जळगांव जिल्हाचा संघ सहभागी होत असून या संघाची निवड समिती सदस्य म्हणून दत्तात्रय महाजन, दिलीप चौधरी, विशाल पाटील, निखिल पाटील यांनी काम पाहिले. या संघाला संघटनेचे पदाधिकारी आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे, प्रा.डी. डी. बच्छाव, उदय पाटील, एन. डी. सोनवणे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त गणपतराव पोळ, प्रा.श्रीकृष्ण बेलोरकर, सुनिल समदाने, राज्य सहसचिव जयांशु पोळ, सौ.विद्या कलंत्री, जिल्हा सचिव राहुल पोळ यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पुरुष/महिला संघ पुढील प्रमाणे.
पुरुष :- मोहित गुंजकर (कर्णधार), कमलेश्वर पावरा, प्रथमेश कंखरे, रोहित कोळी, दिव्यांशू ऐशी, तेजस चौधरी, हिमांशू पाटील, दर्शन भावसार, मोहित महाले, संजय पावरा, रुद्राक्ष माळी, प्रणव जोगी, जयेश धनगर, चेतन भोई, नामानसिंग पाटील
प्रशिक्षक :- गोपाळ पवार तर व्यवस्थापक स्वप्नील कोळी.
महिला :- किरण बोदडे (कर्णधार), नंदिनी पाटील, हर्षाली परदेशी, जान्हवी राठोड, तनिष्का वाघ, लावण्या शिंदे, माहेश्वरी सोनवणे, प्रियंका साळी, पूर्वा पाटील, कल्याणी पाटील, भावना शिंदे, सिद्धी काळे, संजीवनी भिल, दिव्या पवार
प्रशिक्षक यशवंत लांबोळे व्यवस्थापक स्नेहल गायकवाड.
























